Coronavirus : भारताची ‘कोरोना’पासून लवकरच ‘मुक्तता’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगातले विकसित देशही विळख्यात सापडेल आहेत. अमेरिका, इटली, जर्मनी आणि स्पेनसारख्या देशामध्ये मृतांचा आकडे दररोज वाढत आहे. याच दरम्यान शास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनानुसार जगालाही दिलासा मिळू शकतो. उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केल जात आहेत. मात्र, मोसमातील बदल हा देखील कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

MIT च्या अहवालातून भारताला दिलासा
एमआयटी या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुार जर हवामान उष्ण आणि आर्द्रतेने भरलेले असेल तर कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता खूप कमी होईल. ज्या देशात तापमान 3 ते 17 अंश सेल्सिअस दरम्यान आहे आणि आर्द्रता प्रति घनटमीटर 4 ते 9 ग्रॅम आहे त्याठिकाणी कोरोना विषाणूचे 90 टक्के रुग्ण आढळले आहेत. ज्या देशामध्ये पारा 18 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होता आणि आर्द्रता प्रति घनमीटरपेक्षा 9 ग्रॅमपेक्षा जास्त होती. तिकडे 6 टक्केच रुग्ण आढळले आहे. एमआयटीचा हा अहवाल दिलासा देणारा आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार येत्याकाही दिवसांत भारतातील तापमानात वाढ होईल.

अमेरिकेनं दोन क्षेत्रातील फरक केला अधोरेखीत
अमेरिकेतच अभ्यासाअंती उष्ण आणि थंड भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगवेगळा असल्याचे नमूद केले आहे. अमेरिकेच्या उत्तर राज्यांत थंडी अधिक आहे. त्याठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत. तर दक्षिणेकडील राज्य थोडी उष्ण असल्याने उत्तरी राज्यांच्या तुलनेत या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. संशोधनात म्हटले आहे की, भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव उबदार हवामानामुळे खाली आला आहे.

उष्णता भारतासाठी निर्णायक
भारत आणि अमेरिकेच्या सर्व देशांमध्ये कोरोनानं जो काही धुमाकूळ घातलेला आहे. त्यातही भारताला दिलासा देणाऱ्या घटना घडत आहेत. भारताची लोकसंख्या 130 कोटी असून इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचे प्रमाणही कमी आहे आणि मृतांचा आकडा देखील कमी आहे, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. त्यातच एमआयटीचा अहवाल समोर आल्याने भारताला आणखीनच दिलासा मिळाला आहे.