Coronavirus : ‘कोरोना’बाधितांची माहिती लपवली, खासगी डॉक्टर, लॅब चालकासह रूग्णावर FIR

शिक्रापुर / प्रतिनिधी( सचिन धुमाळ) – शिरुर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून कोरोना बाधीत रुग्णाची माहिती लपवीले प्रकरणी खाजगी डाॅक्टर, लॅब चालक यांचेसह कोरोना बाधीत रुग्णावर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार रांजणगाव गणपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय आधिकारी यांना निमगाव म्हाळुंगी( ता.शिरुर) येथे पाॅझीटीव्ह असलेल्या एका रुग्णाच्या हायरिक्स काॅन्टक्ट यादितील एक व्यक्ती सोनेसांगवी येथे राहत असल्याचे समजले.

त्यानंतर त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी मार्फत सोनेसांगवी येथील व्यक्तीकडे चौकशी केली असता.ती व्यक्ती बालाजी हाॅस्पिटल शिरुर या खाजगी डाॅक्टरकडे औषध उपचारासाठी गेली होती तेथील डाॕक्टर भडंगे यांनी त्यास शिरुर येथील कृष्णा लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यास सांगितले त्यानुसार त्या व्यक्तीने कृष्णा लॅब मध्ये सॅम्पल दिले .त्यानंतर त्या व्यक्तीने दिलेल्या सॅम्पलचा रिपोर्ट कोरोना पाॅझीटीव्ह आला.त्यानंतर त्या कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णाला डाॅक्टर भडंगे यांनी सोनेसांगवी येथे घरी थांबून उपचार घेण्यास सांगितले.

वास्तविक पाहता कोरोना विषाणुचा संसर्ग होउ नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार कोरोना बाधीत व्यक्तीची माहिती तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा जवळचा शासकीय रुग्णालयात कळवणे बंधनकारक असून सुध्दा बालाजी हाॅस्पिटलचे डाॅ.भडंगे व कृष्णा लॅबचे मालक यांनी या व्यक्ती बाबत कोणालाही कळवले नाही तसेच बाधित रुग्णाने देखील सदरची माहिती गावातील वैद्यकीय अधिकारी किंवा कोणत्याही शासकीय आधिकारी यांना न कळवता लपून ठेवली.

आणि कोरोना विषाणू या जीवघेण्या साथीच्या रोगाचा प्रसार होवून समाजातील व्यक्तीच्या जीवीतास धोका निर्माण होइल असे कृत्य केले .म्हणून रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे समूह वैद्यकीय अधिकारी यांचे तक्रारी वरून बालाजी हाॅस्पिटलचे डाॅ.भडंगे,कृष्णा लॅबचे मालक तसेच कोरोना बाधित रुग्ण याचा विरोधात रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतीत पुढील तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. संजय गायकवाड ,पो.ना.चद्रकांत काळे,पो.शि.विजय शिंदे यांच्या सह पोलिस नाईक किशोर तेलंग करत आहे