Coronavirs : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो ? तज्ज्ञांनी सांगितले की..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. सध्या गंभीर आजारांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांचा वापर कोरोना बाधित रुग्णांच्या उपचासाराठी केला जाते आहे. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी मास्कचा वापर महत्त्वाचा आहे.

लेडी हार्डींग मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. अपर्णा अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क लावण्याच्या सवयीवर अनेक रिसर्च करण्यात आले आहेत. कॉटनचा मास्क वापरल्याने कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. डॉक्टरांच्या वापरात असलेले सर्जिकल मास्क सामान्य लोकांनी वापरल्यास त्रासाचा सामना करावा लागतो असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

सुरुवातीला लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर केलेल्या संशोधनात लहान मुलांनाही कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ शकते हे दिसून आले. म्हणूनच 12 वर्षावरील लहान मुलांना मास्क वापरणे गरजेचं आहे. त्या खालील वयोगटातील मुलांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दिल्लीच्या रुग्णालयातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा मास्क लावूनच बाहेर पडले पाहिजे.

एकदा वापरलेला मास्क दुसऱ्या दिवशी पुन्हा वापरु नका. जर कापडी मास्क असेल तर धुवून वापरला जाऊ शकतो. खबरदारी म्हणून आपल्यासोबत नेहमी दोन मास्क ठेवणे आवश्यक आहे. अर्धवट सुकलेला मास्क वापरू नका करण यामुळे एलर्जी, खोकला, गुदमरण्याची समस्या उद्भवू शकते. सर्जिकल मास्क वापरत असाल तर एका वापरलेला मास्क पुन्हा वापरु नका. मास्कचा वापर केल्यानंतर फेकून द्या.

कोरोना व्हायरसची लक्षण तुमच्यात असतील तर होम क्वारंटाईन होणे आवश्यक आहे, असे नाही. चुकून एखाद्या कोना रुग्णांच्या संपर्कात तुम्ही स्वत: आला असाल तर तुम्हाला होम क्वारंटाईन व्हावे लागेल. संक्रमित व्यक्तीचे कपडे वेगळे धुवायला हवेत. किंवा संक्रमित रुग्णानं स्वत:च साफसफाई करुन खबरदारी बाळगल्यास योग्य ठरेल.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येचा उच्चांक
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरसच्या संक्रमितांच्या संख्येत रोज नवनवीन रेकॉर्ड रचत आहे. गुरुवारी कोरोना रुग्णांनी अतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. एकाच दिवसात तब्बल 96 हजार 551 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नवीन कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता लवकरच देशात 1 लाख रुग्ण संख्याही नोंदवली जाऊ शकते. एवढेच नाही तर आज 1209 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 45 लाख 62 हजार 414 इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 9 लाख 43 हजार 480 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 76 हजार 271 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासायक बाब म्हणजे आतापर्यंत 35 लाख 42 हजार 663 लोक निरोगी झाले आहेत.