Coronavirus : पुण्यात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा ‘कोरोना’मुळे बळी, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहर पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचे कोरोनामुळे आज मृत्यू झाला. दरम्यान ते गेल्या आठ महिन्यापासून सिकमध्ये होते. सध्या ते ड्युटीवर नसल्याचे सांगण्यात आले आहे.

भगवान पवार (वय 56) असे मृत्यू झालेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक यांचे नाव आहे.

पवार हे शहर पोलीस दलात सहायक उपनिरीक्षक म्हणून कर्तव्यास होते. विशेष शाखा येथे त्यांची नेमणूक होती. दरम्यान त्यांचा 8 महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे ते 8 महिन्यापासून सिक रजेवर होते. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान त्यांना डायबेटिस आणि ब्लडप्रेशरचा देखील आजार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान शहर पालिस दलातील 72 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 46 जणांना उपचारानंतर सोडण्यात देखील आले आहे. तर 2 कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात आता तिसरा मृत्यू झाला आहे.