Corona Effect : 75 वर्षात पहिल्यांदाच पृथ्वी सर्वात ‘साफ’ आणि ‘स्वच्छ’ ! आपण हे नेहमी करू शकत नाहीत का ?

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या कोरोनाचा कहर जगभर वाढत आहे. असलं तरी पृथ्वी मात्र खूप साफ आणि स्वच्छ झाली आहे. कारण लॉकडाऊनमुळं सर्व लोक आपापल्या घरात आहेत. याआधी पृथ्वी एवढी स्वच्छ दुसऱ्या महायुद्धादरम्यान झाली होती. याचा अर्थ असा की, पृथ्वी 75 वर्षात सर्वाधिक स्वच्छ झाली आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, दुसऱ्या महायुद्धानंतर असं पहिल्यांदाच होत आहे की, पृथ्वीचं कार्बन उत्सर्जन सर्वात कमी आहे. लॉकडाऊनमुळं जगभारत कार्बन उत्सर्जन कमी झालं आहे.

5 टक्के घट

ग्लोबल कार्बन प्रोजेक्टचे प्रमुख आणि कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्डमधील प्रोफेसर रॉब जॅक्सन यांनी सांगितल्यानुसार, या वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 5 टक्के घट झाली आहे. याआधी 2008 मध्ये आर्थिक मंदीच्या काळात कार्बन उत्सर्जनमध्ये घसरण झाली होती जी 1.4 टक्के इतकी होती.

त्यांनी सांगितलं की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक देश बंद होते. मार्केट ट्रान्सपोर्टेशन, उद्योग, कारखाने, सर्वकाही बंद होतं. अशात हवेतील प्रदूषण कमी झालं होतं. पुन्हा एकदा तसंच दृश्य पाहायला मिळत आहे.

त्यांनी निराशा व्यक्त केली कारण हा आनंद तात्पुरता आहे. लॉकडाऊन जसं संपेल आपण सर्व पुन्हा त्या घाणीत जगायला मजबूर होऊन जाऊ. पुन्हा एकदा प्रदूषणयुक्त श्वास घ्यावा लागेल. त्यामुळं याला हळूहळू कमी करण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं.