Coronavirus : वुहानमधील ‘कोरोना’च्या पहिल्या रूग्णावर उपचार करणार्‍या महिला डॉक्टरनं केला मोठा खुलासा, जाणून घ्या

 हुबई : वृत्त संस्था  – जगभरात कोरोना संसर्गाचे २२ लाख ४० हजार १९१ रुग्ण असून एकूण मृतांची संख्या दीड लाखांच्या वर गेली आहे. चीन व युरोपनंतर अमेरिकेत या संसर्गाची सर्वाधिक म्हणजे सात लाखाच्या वर रुग्णसंख्या पोहचली असून, दिवसागणिक कोरोना संसर्गाचा प्रसार देखील वाढत आहे. या संसर्गाचा प्रसार चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरातील मासळी विक्री केली जात असलेल्या मार्केटमधून झाल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे अमेरिकेसह बऱ्याच देशांनी वुहानच्या सरकारी प्रयोगशाळेत हा संसर्ग तयार झाल्याचा दावा केला आहे. अमेरिका व चीनमध्ये या संसर्गावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, त्याच दरम्यान कोरोना संसर्गाच्या पहिल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आता समोर आल्या आहे.

चिनच्या सरकारी माध्यमांनुसार, डिसेंबर २०१९ मध्ये वुहानमध्ये एका वृद्ध महिलेला कोरोना संसर्ग झाला होता. तेव्हा ही महिला प्रथम झांग जिक्सियन नावाच्या एक महिला डॉक्टरकडे उपचारासाठी गेल्या असता तिथे त्यांचे सिटी स्कॅन केले. चीनने केलेल्या दाव्यानुसार, ही पहिली महिला डॉक्टर आहेत. ज्यांनी पहिल्यांदाच या संसर्गाबद्दल प्रशासनाला इशारा दिला. वुहान प्रशासनाने त्यांच्या या कामगिरी बद्दल डॉक्टरांचे कौतुक केले आहे.

श्वसन विकारावर उपचार करतात झांग

डॉक्टर झांग यांनी सांगतिल्याप्रमाणे, २६ डिसेंबर रोजी वुहान प्रांतातील एक वयोवृद्ध दाम्पत्य हुबे प्रांतीय रुग्णालयात पोहचलं होत. त्यावेळी या महिलेची तपासणी केली असता या संसर्गाविषयी माहिती समोर आली. परंतु त्यावेळी आम्हाला माहिती नव्हते की, हे इतके गंभीर संकट असेल. रुग्णालयाच्या श्वसन विकार विभागाच्या संचालक असलेल्या झांग यांनी सांगतिले की, या वृद्ध दाम्पत्याला फ्लू किंवा न्यूमोनियासारखे दिसणारे ताप, खोकला, आणि थकवा अशी लक्षणे दिसली.

मात्र जेव्हा दुसऱ्या दिवशी सिटी स्कॅन करण्यासाठी आलेल्या दाम्पत्यात जेव्हा झांग यांना त्यांच्यात फ्लू किंवा सामान्य न्यूमोनिया पेक्षा काहीतरी वेगळी लक्षणे दिसली. तेव्हा २००३ मध्ये आलेल्या सार्स साथीसारखाच हा प्रकार असल्याची कल्पना झांग यांना झाली. वृद्ध दाम्पत्याचे सिटी स्कॅन पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला बोलवून घेतले. व त्याला सुद्धा सिटी स्कॅन करण्यास सांगितले.

सिटी स्कॅन साठी तयार नव्हता मुलगा

डॉ.झांग म्हणल्या की, त्यांच्या मुलाने पहिल्यांदा चाचणी करण्यास नका दिला होता. त्याला कोणतीही लक्षणे किंवा समस्या नव्हती व त्याला वाटले की, मी त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु झांगच्या दबावाखाली येत त्याने चाचणी केली आणि आणखी एक पुरावा झांग यांना सापडला. आई वडिलांप्रमाणेच त्या मुलाच्या फुफ्फुसात देखील असामान्य हालचाली दिसत होत्या. झांग यांनी सांगितले की, संसर्गजन्य आजार असल्याशिवाय एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना एकाच वेळी समान आजार होत नाही.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी २७ डिसेंबरला दुसरा रुग्ण रुग्णालयात आला तेव्हा त्यालाही तशीच लक्षणे दिसू लागली. चारही रुग्णांच्या रक्त चाचण्यांद्वारे हा संसर्गजन्य आजार असल्याचे आढळून आले. झांग यांनी इन्फ्लूएंझा संबंधित अनेक चाचण्या घेतल्या, मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर झांग यांनी तो अहवाल रुग्णालयात सादर केला व तेथून तो रोग नियंत्रक प्रतिबंधक जिल्हास्तरीय केंद्राकडे सोपविण्यात आला. त्या अहवालात असे म्हटलं होत की, आम्हाला एक नवीन विषाणूजन्य आजार सापडला असून, हा कदाचित संसर्गजन्य आहे.