मोठा दिलासा ! ‘कोरोना’ व्हायरसमुळं मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत होतेय ‘घट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या जीवघेण्या कोरोनाव्हायरसंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, गेल्या जवळपास 2 महिन्यांपासून या व्हायरसमुळे रोज 100 हून अधिक लोकांचा मृत्यू होत होता. मात्र, नुकताच मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच दिवसांत दररोज मृतांच्या संख्येत मोठी घसरण दिसून आली आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 75,196 लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 74,185 लोक फक्त चीनमधील आहेत. या प्राणघातक विषाणूमुळे एकूण 2009 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 2004 लोक चीनमधील आहेत. या आजराच्या उपचारावर संशोधन सुरु आहे. मात्र, यादरम्यान चांगली बातमी समोर आली असून कोरोनाव्हायरसमधून दररोज मृत्यू पावणाऱ्यांची संख्या गेल्या पाच दिवसांपासून 98 आहे. तर, गेल्या एका महिन्यापासून ते 100 च्या वर होते. तर 12 फेब्रुवारी या एका दिवसात 248 मृत्यू झाले.

याबाबत माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधानोम घेब्रिसिस म्हणाले की, कोरोनाव्हायरसमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या कमी होत आहे ही चांगली गोष्ट आहे. परंतु लवकरच अशी आशा बाळगणे चांगले नाही. कारण व्हायरस पूर्वीपेक्षा जास्त लोकांना संक्रमित करू शकतो. असे नाही की कोरोनाव्हायरसद्वारे केवळ लोक मारले जात आहेत. आतापर्यंत सुमारे 14,449 लोक या आजाराने बरे झाले आहेत. बरे होणार्‍या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसीसी) ने वुहानसह चीनमध्ये नुकताच केलेल्या अभ्यासानुसार, कोरोनाव्हायरस संक्रमित झालेल्या सर्व लोकांपैकी, 81 टक्के लोक सौम्य पातळीच्या आजाराने ग्रस्त होते. जगभरात कोरोनाव्हायरसमुळे आजारी पडलेले सुमारे 74.7 टक्के लोक चीनच्या हुबेई प्रांतातील आहेत. त्यापैकी वुहान शहरातील सर्वाधिक आहे. दरम्यान, वेगळे ठेवल्यामुळे मृतांची संख्या 2.3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकली नाही.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) चे संचालक टेड्रोस अधानोम घेब्रिसिस म्हणाले की, फेब्रुवारीपासून कोरोनाव्हायरसच्या संसर्ग असणाऱ्यांच्या संख्येत, मृतांच्या संख्येत आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत मोठे बदल होत आहे. आपण अजून थोडी प्रतीक्षा केली पाहिजे जेणेकरून काही योग्य निष्कर्ष काढता येतील. तसेच, कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे पुरुष किंवा स्त्रिया कोण अधिक आजारी पडले आहेत सांगणे देखील कठीण आहे. कारण या विषाणूने दोघांनाही तितकेच घेरले आहे.