Coronavirus : ‘कोरोना’चं संकट टळल्यानंतर बदलणार जगाचा ‘आर्थिक’ भूगोल, अमेरिका नव्हे तर ‘हा’ देश बनणार महाशक्ती

नवी दिल्ली : वृत्तंसंस्था – कोरोनाचा प्रदुर्भाव संपूर्ण जगभरात झाला असून कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या जागतिक आपत्तीबद्दल विविध प्रकारची भविष्यवाणी केली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मेते कोरोना ही नैसर्गीक आपत्ती नाही तर दोन महासत्तांमधील लढाईचा परिणाम आहे. तर काहींच्यामते येणाऱ्या काळात युद्धाची पारंपारीक पद्धत बदलेल आणि त्याचप्रमाणे प्रत्येकजण विरोधकांचा पराभव करण्यासाठी कूटनितीचा वापर करेल.

या व्हायरसचा जगभरातील प्रभाव आणि विध्वंसक संभाव्यतेचा परिणाम पाहता चीनेने अमेरिका आणि अमेरिकेने चीनवर आरोप केले आहेत. मात्र या दोन देशांच्या आरोपावरून हे सिद्ध झाले आहे की या व्हायरसचा शस्त्र म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. दरम्यान, या जैविक आपत्तीनंतर जगामध्ये बदल दिसेल हे आत्तापासून दिसू लागले आहे.

सध्याच्या काळात सर्वात सामर्थ्यवान देश म्हणून अमेरिका आहे यात काही शंका नाही. जगाच्या अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत जी काही मिनिटांत जगाला उध्वस्त करू शकतात. त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात खनिज संपत्ती आहे आणि धान्याचे भंडार आहे.

शिक्षण, आरोग्य आणि ज्ञान विज्ञानात तो जगातील इतर देशांपेक्षा आघाडीवर आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत सध्या जगभरात वापरण्यात येणारे नैसर्गिक तेल आणि वायूंचे मोठे साठे आहेत. याशिवाय सध्या जगभरातील काही देश अमेरिकेच्या डॉलरमध्ये व्यापार करत आहेत. म्हणजे आपले चलन डॉलरमध्ये बदलून त्यानंतर व्यापार केला जात आहे.

चीनच्या विकासात अमेरिकेचा मोठी भूमिका
अमेरिकेच्या सार्थ्याबाबत बोलायचे झाले तर शीत युद्धाच्या समाप्तीपासून अमेरिका जगभरातील सामर्थ्यवान देश बनला आहे. अमेरिकेच्या सामर्थ्याला जो कोणी आव्हान देईल त्यामध्ये अमेरिकेचा विजय झाला आहे. सोव्हियत रशियाला उद्धवस्त केल्यानंतर अमेरिकेने जगाला आपल्या मुठीत ठेवले आहे. पण आता चीनकडून आव्हान देण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या रणनितीकारांना असे वाटू लागले आहे की चीन त्यांना टक्कर देऊ शकते. चीनमध्ये आज जो काही विकास झाला आहे त्यामध्ये अमेरिकेची मोठी भूमिका असली तरी आता चीनच्या नजरेत अमेरिका खटत आहे. चीनमधील कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिकेत वाढताना दिसत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर चीनची अर्थव्यवस्था कोलमडेल असे वाटत होते. मात्र, चीनने स्वत:ला यातून सावरले आहे. चीनचे मित्र असलेल्या इटली आणि इराणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. असे असले तरी चीनकडून या देशांना मदत पुरवली जात आहे. यासह क्युबाने आपल्या डॉक्टरांचे एक पथक देखील या देशात पाठवले आहे. यामुळे हे सिद्ध होते की कोरोना व्हायरसबाबत जे सांगितले जात आहे ते नसून खरे रहस्य वेगळेच आहे.

चीनच्या मनात काय आहे ?
चीनने वन बेल्ट वन रोडच्या माध्यमातून जगभरातील देशांना एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बन बेल्ट वन रोड अंतर्गत आशिया, योरोप, आफ्रिका मधील 70 टक्के देश रेल्वे, रस्ते आणि समुद्री मार्गाने जोडण्यात येणार आहेत. यासाठी चीन तब्बल 900 अब्ज डॉलर्स म्हणजेच 64 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. ही रक्कम जगातील एकूण डीईपीच्या एक तृतीयांश आहे. यानंतर चीनने शांघाय को ऑफरेशन ऑर्गनायझेशन नावाची आर्थिक आघाडी देखील तयारी केली आहे. ही आघाडी अमेरिकेप्रमाणेच विकसीत होत आहे. यामध्ये भारत आणि रशियाचा समावेश आहे.

चीनने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत ब्रिक्स नावाचे जागतिक आर्थिक व्यासपीठ तयार केले आहे. यामध्ये भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशाचा समावेश आहे. या देशांच्या प्रमुखांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे की या देशांमध्ये जे काही व्यापार होतील ते परस्पर देवाण-घेवाणीतील असतील. अमेरिका याकडे एक आव्हान म्हणूनच पहात आहे.
कोरोना आपत्तीला सामोरे जाण्यासाठी चीनने जगभरातील देशांना ज्या प्रकारे मदत केली आहे. त्यावरून कोरोनाची आपत्ती संपल्यानंतर जगभरात चीनचा प्रभाव वाढेल. चीनकडून जगभरातील 82 देशांना कोरोनाशी लढण्यासाठी मदत करत आहे.

कोरोनाचा अमेरिकेच्या जागतिक मिशनवर परिणाम, याचा चीन फायदा घेणार
चीन आणि रशिया जागतिक आरोग्य संघटना आणि युनायटेड नेशन्स सारख्या संघटनांना आपल्या सोबत घेऊ शकता. या संघटना आर्थिक अडचणीत असून अलिकडच्या काळात अमेरिकेने या दोन संघटनांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या दोन्ही संघटना चीनला सहकार्य करू शकतात. चीनने जगभरातील 17 टक्के व्यापार आपल्या ताब्यात घेतला आहे.

कोरोना अमेरिकेला कमकुवत बनवेल आणि अमेरिकेतच त्याच्या नेतृत्वाबाबदल अविश्वासाची भावना निर्माण होईल, असे सध्यातरी स्पष्टपणे दिसत आहे. याचा परिणाम अमेरिकेच्या जागतिक मिशनवर होईल आणि याचा फायदा चीन घेईल आणि चीन आपल्या पद्धतीने जगाची रचना करण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये अमेरिकन राष्ट्रवादाने त्रस्त असलेल्या युरोपियन युनियनचे देश चीनच्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळे कोरोना आपत्तीच्या सुरुवातीपासूनच जागतिक सत्तेच्या बदलाची वेळ येत असल्याचे दिसून येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like