Coronavirus | चीनमध्ये कोरोनाची दहशत ! बंद होऊ लागले मॉल-हौसिंग कॉम्प्लेक्स, महामारीचा कहर पुन्हा सुरू!

बिजिंग : वृत्तसंस्था Coronavirus | चीनमध्ये कोरोना महामारीचा (Coronavirus) कहर पुन्हा सुरू (Covid-19 Outbreak) झाल्याने प्रशासनाने आता कठोर पावले (Strict Action) उचलण्यास सुरूवात केली आहे. राजधानी बिजिंगमध्ये प्रशासनाने अनेक मॉल (Many Malls) आणि हौसिंग कॉम्प्लेक्स (Housing Conplex) सील (seal) केले आहेत. लोकांना विनाकारण बाहेर न फिरण्याची ताकीद दिली आहे.

 

गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या अगोदर आणि आऊटब्रेकनंतर चीन कठोर नियमांचा आधार घेत आला आहे.
जगातील सर्वात कठोर लॉकडाऊन चीनमध्ये लावले गेले आहेत. तरीही येथे अनेकदा महामारी पसरली आहे.

 

राजधानी बिजिंगमध्ये गुरुवारी कोरोनाची 6 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
स्थानिक मीडियानुसार, जे लोक कोरोना संक्रमित झाले आहेत, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केली गेली आहे.
सोबत ज्या-ज्या हौसिंग कॉम्प्लेक्समध्ये संक्रमित रूग्ण सापडले आहेत, त्या जागा सील करण्यात आल्या आहेत.

 

ट्रेसिंगमध्ये मदत करणार्‍यांना बक्षीस

 

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचा दावा आहे की, चीनमध्ये बाहेरून आलेली प्रकरणे दबाव निर्माण करत आहेत.
अशावेळी रशियाला लागून असलेल्या शहरांमध्ये कोरोना संक्रमितांबाबत (Coronavirus) माहिती देणार्‍यांसाठी बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.

 

स्थानिक प्रशासनाने म्हटले की, कोरोना संशयीत किंवा संक्रमितांना ट्रेस करण्यात जे मदत करतील त्यांना बक्षीस म्हणून एक लाख युआन म्हणजे 15500 डॉलर दिले जातील.
दरम्यान, कठोर लॉकडाऊनमुळे चीनी लोकांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त समोर आले आहे. 3 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चीनमध्ये जवळपास 76 टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

 

Web Title : Coronavirus | covid 19 havoc in china administration seals off mall housing compounds

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | कोरोना काळात ‘स्मशानभूमी’ मध्ये न केलेल्या कामांच्या बिलांची महापालिका प्रशासनाने घेतली गंभीर दखल; कोरोना प्रतिबंधासाठी केलेली कामे व खरेदीचे प्राधान्यक्रमाने ऑडीट करणार

Amit Shah | अमित शहा 26 तारखेला पुण्यात ! शरद पवार अध्यक्ष असलेल्या VSI च्या भेटीचा दौऱ्यात समावेश

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,016 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी