Coronavirus : ‘कोरोना’वर नवीन थेअरी ! 10-15 वर्षात माणसांना ‘आजारी’ पाडतोय ‘हा’ व्हायरस

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   वटवाघूळ, साप, पॅंगोलिग (मुग्या खाणारा जीव) यापैकी कोणत्या प्राण्यातून कोरोनाचा प्रसार झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जगभरातील वैज्ञानिक यामुळे चिंतेत आहेत की नेमकं कोणत्या जनावरातून, प्राण्यातून हा व्हायरस मानवी शरीरात आला. कोरोना व्हायरस कोविड – 19 मुळे 37 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आता नवा सिद्धांत (थ्योरी) समोर आली आहे की कोरोना व्हायरस इतका घातक होण्याच्या पूर्वीपासून 10 – 15 वर्षांपासून माणसांना आजारी करत आहे, परंतु आता हा व्हायरस इतका भयानक झाला आहे की लोकांचा जीव घ्यायला लागला आहे.

कॅनिफोर्नियाची स्क्रिप्स युनिवर्सिटी, कोलंबिया युनिवर्सिटी, युनिवर्सिटी ऑफ एडिनबर्ग, युनिवर्सिटी ऑफ सिडनी आणि तुलेन युनिवर्सिटीच्या शोधकर्त्यांनी एक सिद्धांत मांडला की कोरोना व्हायरस जवळपास 10 – 15 वर्षांपासून मानवामध्ये आजार पसरवत आहे परंतु कोणाचा मृत्यू झाला नव्हता.

एका वृत्तानुसार, आता हा व्हायरस इतका घातक झाला आहे की हजारो लोकांच्या मृत्यूचे कारण झाला आहे. या सर्व विश्वविद्यालयाच्या शोधकर्त्यांनी दावा केली की कोरोना व्हायरस पसरण्यासाठी सर्वात सामान्य प्रसारक वटवाघूळच आहे. यामुळेच हा व्हायरस माणसांमध्ये आला.

या थ्योरीमध्ये हे देखील आहे की मागील 10 – 15 वर्षादरम्यान कोरोना पॅंगोलिनच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरला परंतु याचा परिणाम कमी होता. हळू हळू या व्हायरस विकासित झाला.

आता हा व्हायरस मानवी शरीरातील फुफ्फुसांवर हल्ला करत आहे. यामुळे लोकांचा जीव जात आहे, नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थचे निदेशक डॉ. फ्रॉसिस कोलिंस यांनी झोप उडवणारी माहिती दिली. कोलिंस मात्र या शोधकर्त्यांच्या गटात नाहीत.

डॉ. कोलिंस म्हणाले, हे शक्य आहे की कोरोना दीड दशकापासून लोकांना आजारी करत आहे परंतु त्याचा परिणाम कमी होता. आता मात्र हा व्हायरस आधिक ताकदवान झाला आहे आणि घातक. ज्यामुळे हा व्हायरस अनेकांचा जीव घेत आहे.

यापूर्वी देखील 2002 – 2003 मध्ये जेव्हा सार्स पसरला होता तेव्हा या व्हायरस पसरवण्यास सिवेट्स या प्राण्याला जबाबदार ठरवले होते, त्यानंतर हजारो सिवेट्सला मारण्यात आले होते.

या शोधकर्त्यांचा दावा आहे की चीनमध्ये पसरणारा कोरोना मागील 10 – 15 वर्षांपासून लोकांना आजारी करत आहे परंतु त्याचा परिणाम गंभीर नव्हता. परंतु आता या धोकादायक व्हायरसने सर्वांची झोप उडाली.

हा रिसर्स पेपर जगातील प्रसिद्ध अशा नेचर मॅगजीनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. शोधकर्त्यांच्या थ्योरीमध्ये सांगण्यात आले की कोविड – 19 10 – 15 वर्षांपूर्वी इतका घातक नव्हता. यात असे ही सांगण्यात आले आहे की जनावरांमधून माणसांमध्ये येऊन, परत जनावरांमध्ये जाणं, परत माणसांमध्ये येणे हे आधिक घातक होत गेले ज्यामुळे आता संपूर्ण जग या व्हायरसमुळे समस्येत आहे.