Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये माकड उडवतंय पतंग, लोक पाहूनच झाले ‘दंग’ (व्हिडीओ)

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू केला आहे. लोक या लॉकडाउनमुळे खूपच वैतागले आहेत, तर नेहमी कैद असणारे प्राणी मजा करीत आहेत. असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जे पाहून आपण आपले हसू रोखू शकणार नाही किंवा आपण तो व्हिडिओ पाहल्याशिवाय राहू शकणार नाही. होय, एक माकड पतंग उडवताना दिसत आहे. हा मजेदार व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

खरं तर हा माकड गच्चीवर बसला होता त्यावेळी एक पतंग आणि मांजा त्याच्यासमोर येऊन पडले. मग काय, माकडाने पतंग उडवण्यास सुरवात केली. आकाशात बरीच पतंगे उडत होती, त्यानेही उडवण्यास करायला सुरुवात केली. मग त्यालाही पतंग उडवायला मजा येऊ लागली. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. वानर गच्चीवर उभा राहून पतंग उडवत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, जोरदार वारा सुरु आहे आणि माकड पूर्ण लक्ष देऊन पतंग नियंत्रित करीत आहे.

आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यासोबतच व्हिडिओला बर्‍याच लाईक्स आणि री-ट्वीटदेखील आल्या आहेत. ट्विटरवर लोकांना हा व्हिडिओ खूप पसंतीस पडला आहे. लॉकडाउनमुळे लोक घराच्या बाहेर येणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. सहसा अशी आश्चर्यकारक दृश्ये पाहिली जात नाहीत.

अलीकडेच, एक नीलगाय नोएडाच्या जीआयपी मॉलच्या बाहेर फिरताना दिसली. यावेळी, तेथून जाणाऱ्या लोकांनी त्या नीलगायचा व्हिडिओ काढला होता. केरळमधील कोझिकोडच्या वाळवंटात फिरणाऱ्या एका पिंगट मांजरीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याशिवाय देहरादून भागात हत्ती फिरताना दिसला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाला होता.