Coronavirus : ‘तोडून टाकू तुमच्या शरीराचा कोपरा अन् कोपरा, पण होऊ देणार नाही तुम्हाला कोरोना’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   देशातील प्रत्येक राज्यातील पोलिस कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी योद्धा म्हणून काम करत आहेत. रात्रंदिवस पोलिस कर्मचारी व अधिकारी रस्त्यावर बंदोबस्त करण्यात मग्न असतात. लॉकडाउन पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासह त्यांनी असे लिहिले आहे की, या पोलिस कर्मचाऱ्याच्या बोलण्याचा देखील तुमच्यावर जर परिणाम झाला नाही, तर तुमचा बचाव अवघड आहे … ऐका, भावाचे भावनिक आवाहन.’

वास्तविक, खासदार संजय सिंह यांनी सामायिक केलेल्या व्हिडिओमध्ये एक पोलिस लॉकडाऊन दरम्यान गस्त घालताना दिसत आहे. तसेच,म्हणत आहे कि, कोणीही घराबाहेर पडणार नाही, हा पोलीस कर्मचारी पुढे म्हणतो कि, ‘ तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर होने ना देंगे तुमको कोरोना ‘ दरम्यान, सुरतच्या उधना पोलिस ठाण्याचे हवालदार प्रवीण पाटील यांना भीमनगर झोपडपट्टी भागात जमावा संदर्भात संदेश मिळाला आणि पीसीआर व्हॅन घेऊन ते तेथे पोहोचले. लोकांनी दगडफेक करू नये म्हणून पीसीआर व्हॅनमध्ये लाऊडस्पीकर बसवून त्यांनी लोकांना त्यांच्या घरी जाण्याचे आवाहन करण्यास सुरवात केली. दरम्यान, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील म्हणाले की, तुमच्या शरीराचा कोपरानं- कोपरा तोडू, पण तुम्हाला कोरोना होऊ देणार नाही.

लडाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. स्वत: पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनादेखील माहित नव्हते की त्यांचा व्हिडिओ इतका लोकप्रिय होईल.