Coronavirus | हळुहळु फ्लू सारखा होईल कोरोना ! ICMR चे तज्ज्ञ म्हणाले – ‘दरवर्षी घ्यावी लागू शकते व्हॅक्सीन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) सुरू आहे, परंतु एक्सपर्टने शक्यता वर्तवली आहे की, काही काळानंतर कोविड-19 (Covid-19) आजार सुद्धा इन्फ्लुएंजा (Knfluenza) प्रमाणे होईल. असेही म्हटले जात आहे की, जास्त जोखीम असलेल्या लोकांना यापासून बचावासाठी दरवर्षी कोरोना व्हॅक्सीन घ्यावी लागू शकते.

सध्या, देशात कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेबाबत (Third Wave) तयारी केली जात आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, जर लोकांनी कोविडसंबंधी सूचनांचे पालन केले नाही तर तिसरी लाट 6-8 आठवड्यांमध्ये येऊ शकते.

 

काय आहे पेंडेमिक आणि एंडेमिक

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये डिव्हिजन ऑफ ऐपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीजचे प्रमुख समीरन पांडा यांनी म्हटले की, काही काळानंतर कोविड-19 एंडेमिक स्टेजवर पोहचू शकतो. सेंटर्स फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोल (CDC) च्यानुसार, एखाद्या भौगोलिक प्रदेशात लोकसंख्येत एखादा आजार किंवा संसर्गजन्य एजंटची उपस्थिती किंवा प्रसाराला एंडेमिक म्हणतात.

त्यांनी म्हटले, जेव्हा छोटे व्हायरस वेगाने वाढतात, तेव्हा त्यांच्यासाठी म्यूटेशन करणे सामान्य बाब आहे. एक्सपर्ट सांगतात की, कोविड-19 व्हायरस काही काळानंतर इन्फ्लुएंजा प्रमाणे एंडेमिक स्टेजमध्ये पोहचेल आणि यानंतर जोखिम असलेल्या लोकसंख्येला दरवर्षी व्हॅक्सीन घ्यावी लागेल. इन्फ्लुएंजा सुद्धा 100 वर्षापूर्वी पेंडेमिक म्हणजे महामारी होता, परंतु आज तो एंडेमिक आहे.

त्यांनी म्हटले, कोविड-19 च्या प्रकरणात सुद्धा आम्हाला आशा आहे की,
हा हळुहळु आपली सध्याची महामारीची स्थिती बदलून एंडेमिक होईल.
सध्या, आपण ज्येष्ठांना फ्लूचा वार्षिक डोस देण्याचा सल्ला देतो.
जसा इन्फ्लुएंजा व्हायरस म्यूटेट करत राहतो,
तसा आम्ही व्हॅक्सीनमध्ये किरकोळ बदल करत राहतो.
यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही.

Web Title :-  Coronavirus | covid may become flu like endemic annual vaccines for at risk groups icmr expert

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

Pune News | शेरेबाजी करण्यापेक्षा पाटील यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत – माजी आमदार मोहन जोशी

फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा

Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य