Coronavirus : डोळयात असलेल्या एस-2 रिसेप्टरमधून देखील शरीरात घुसू शकतो ‘कोरोना’ व्हायरस

नवी दिल्ली – मास्क, हातमोजे वापरून, चेहऱ्यावर हात लावयचं टाळून कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहता येतं हे आपल्याला माहीत आहे. पण आता शास्रज्ञांनी एक नव संशोधन केलं आहे ज्यानुसार डोळ्यांत असलेल्या एस-2 या रिसेप्टरमधूनही कोरोना विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. कोरोनाबाधिक व्यक्ती खोकली किंवा शिकंली तर त्यातील कण आपल्या डोळ्यांतील एस-2 रिसेप्टरला चिकटून कोरोना विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील शास्रज्ञांनी केलेल्या संशोधनात ही माहिती पुढे आली आहे. डोळ्यांत विषाणू पोहोचला तर डोळे लाल होतात आणि त्यांना सूज येऊ शकते. सर्वाधिक धोक्याची बाब म्हणजे डोळ्यांतील अश्रूंमधून विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

नेत्ररोग विभागाचे डॉ. लिंग्ली झोहू म्हणाले, ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही अशा 10 मृतदेहांची पोस्ट मॉर्टेम तपासणी केल्यावर डोळ्यांतील रिसेप्टर -2 च्या माध्यमातूनही कोरोना विषाणू शरीरात जाऊ शकतो हे आमच्या लक्षात आले. डोळ्यांतून निघणाऱ्या घाणीमुळेही करोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे लोकांनी डोळे पुसण्यासाठी वापरलेले कापड दुसऱ्या कामासाठी वापरू नये, असाही सल्ला शास्रज्ञांनी दिली आहे. डोळ्यांतील विषाणू नाकावाटे घशात प्रवेश करू शकतो, असे निरीक्षण इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनमधील वायरस जिमोनिक्सचे प्रा. पॉल केलम यांनी नोंदवले आहे.