Coronavirus : संभाजी भिडेंनी ‘कोरोना’ दूर करण्यासाठी सूचवला ‘उपाय’, ‘या’ 2 पदार्थांवर दिला विशेष भर

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  देशासह राज्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराच्या वर गेला आहे. तर राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशेच्या वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारनं या उपायांचा वापर करावा अशी मागणी त्यांनी पत्रकाराशी बोलताना केली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश 65 ते 70 वर्ष वयातील व्यक्ती आहेत. या रोगामुळे तरुण क्वचितच मृत पावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तरुण मुलांना मैदानात खेळायला सोडावं. सरकारनं लागू केलेल्या बंधनामध्ये शिथिलता आणायला पाहिजे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. कोरोनावरील उपचारांमध्ये गोमूत्र आणि गायीचं तूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा दावा देखील त्यांनी केला आहे. गोमूत्र, गायीचं तूप, अतितीव्र जंतूनाशकं आहेत. त्यामुळे कोरोनावर उपचार करताना गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करण्याचे त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला सुचवलं आहे.

गायीच्या तुपाचा आणि गोमुत्राचा वापर करावा

कोरोनाबाधितांच्या खाण्यापिण्यात गोमूत्र, गायीच्या तुपाचा उपयोग केला जावा. त्यामुळे नक्कीच फरक पडेल. कोणताही जंतू श्वसनावाटे आपल्या शरिरात प्रवेश करतो. मी आयुर्वेद वाचलेलं आहे. या जंतूंचा नाश करण्याचं सामर्थ्य गायीच्या तुपामध्ये असून बाकी कशातही इतकी शक्ती नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या नाकाला दर 3 ते 4 तासांनी तुपाचं बोट लावावं. सकाळ संध्याकाळ त्यांना गोमूत्र प्यायला द्यावे असे उपाय संभाजी भिडे यांनी सुचवले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like