संशोधकांकडून मोठा खुलासा ! चीनच्या वुहान लॅबमध्येच कोरोनाची व्हायरसची निर्मिती; फिंगरप्रिंट मिळाले?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन China देशातील वुहान शहरातील विषाणूशास्त्र संस्थेत कोविड विषाणू तयार केला गेला. यासंदर्भातला अभ्यासानुसार एक मोठा खुलासा समोर आला आहे. तर चीनमधील वैज्ञानिकांनी विषाणू बनवल्यानंर त्याला रिव्हर्स-इंजिनिअरिंग व्हर्जनपासून बदलण्याचा प्रयत्न केला. या बदलामुळे नागरिकांना वाटावं की, या व्हायरसची निर्मिती वटवाघळांपासून झालीय, असा उल्लेख या रिपोर्टमध्ये केला आहे. यानुसार आणखी एकदा चीनच्या China वुहान प्रयोगशाळेतूनच विषाणूचा प्रसार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. अमेरिका आणि ब्रिटननं या देशाने याप्रकरणाच्या तपासासाठी जागतिक आरोग्य संघटनेवर (World Health Organization) दबाव निर्माण केलाय. तसेच, ब्रिटिश कर्करोग विज्ञानाचे प्रा. एंग्स डल्गलिश आणि नॉर्वेचे वायरोलॉजिस्ट डॉ, बिर्गर सोरेनसन यांनी हा रिपोर्ट तयार केल्याचे डेली मेल’च्या वृत्ताने सांगितले आहे. तसेच, चीनमध्ये एका वर्षाहून जास्त काळापासून विषाणूच्या रेट्रो-इंजिनिअरिंगवर काम सुरू असल्याचे सबळ पुरावे त्यांच्या हाती आहेत.

मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

मुख्यतः म्हणजे डल्गलिश आणि सोरेनसन लस बनवण्यासाठी कोरोना व्हायरसच्या सँपलचा अभ्यास करत होते. त्यावेळी त्यांना विषाणूमध्ये एक ‘खास फिंगरप्रिंट’ सापडलं आहे. या निशान्यावरून या विषाणूंवर प्रयोगशाळेत बदल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे याचा पुरावा मिळतो. तसेच, जेव्हा या दोन्ही वैज्ञानिकांनी ही माहिती छापण्याचा निर्धार केला तेव्हा त्यांना एका विज्ञान जर्नलनं नकार दिला, असे देखील या दोघांचं म्हणणं आहे. दरम्यान, गतवर्षी असं म्हटलं होत की, विषाणूचा संसर्ग वटवाघळांकडून माणसामध्ये जात आहे.

बँक बुडाली तर बुडणार 4.8 कोटी खात्यांवरील रक्कम, जाणून घ्या तुमचे डिपॉझिट सुरक्षित आहे किंवा नाही

तसेच याबाबत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही देशाच्या गुप्तचर यंत्रणांना कोरोना विषाणूचे मूळ शोधण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून आता चीनसमोरील संकटं वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका वर्षानंतर अनेक तज्ज्ञांना, राजकीय नेत्यांना आता सर्वांना विश्वास बसणं सुरू झालं आहे की या विषाणूची निर्मिती वुहान प्रयोगशाळेतूनच करण्यात आली आहे. तसेच, वुहानच्या प्रयोगशाळेतून जाणूनबुजून कोरोना संदर्भातील डेटा नष्ट करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. महत्वाची माहिती लपविण्याचा आणि ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असे अभ्यासाकडून सांगण्यात आले आहे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी