Coronavirus : ‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार, पहिल्यांदा ‘निगमबोध’ स्मशानभुमीनं दिली नव्हती ‘परवानगी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता, त्यानंतर निगमबोध अंत्यसंस्कार घाटावर त्या महिलेवर अत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला. यामुळे नातेवाईक संतापले होते. नातेवाईक जेव्हा शव घेऊन पोहोचले तेव्हा निगम घाट प्रशासनाने अंत्यसंस्कार करण्यास परवानगी नाकारली. एका नातेवाईकाने सांगितले की निगमबोध घाटाचे प्रमुखांना फोन लावून जेव्हा स्थितीची माहिती दिली तेव्हा त्यांनी दुसरीकडे अंत्यसंस्कार करण्यास सांगिलते. तर लोधीघाट स्मशान घाटवर देखील अत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला.

परंतु जेव्हा माध्यमांनी याची दखल घेतली तेव्हा निगमबाध घाटावर अंत्य संस्कार करण्यास परवानगी देण्यात आली. तीन तासानंतर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

त्यानंतर सीएनजी दहनात महिलेचे अंत्यसंस्कार करण्यात आले. राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या गटाच्या देखरेखीत सर्व खबरदारी बाळगून अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवारी दिल्ली राम मनोहर लोहिया रुग्णालयात कोरोनाचे हे प्रकरण समोर आले. कोरोनाची लागण झाल्याने 69 वर्षीय महिला दिल्लीच्या रुग्णालयात भरती झाली होती. महिलेला मधुमेह आणि हायपरटेंशनची समस्या होती. मृतक महिलेला एक मुलगा आहे आणि तो विदेशातून नुकताच परत आला होता.

याआधी कर्नाटकात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा एका महिलेच्या मृत्यूनंतर मृतकांचा आकडा 2 झाला आहे. भारतात कोरोनाचे एकूण 85 प्रकरण समोर आली, याशिवाय चार लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले.