Coronavirus : कर्नाटकातील पहिल्या ‘कोरोना’ संशयिताचा मृत्यू, सर्वत्र प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोना व्हायरसची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 62 वर गेला आहे. महाराष्ट्रासह राजस्थानातही कोरोनाचा पॉझिटीव रुग्ण आढळला आहे. दिल्लीनंतर आर्थिक राजधानी मुबंईतही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. या सगळ्यानंतर आता कर्नाटकमध्ये एका 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे असा संशय होता.

कर्नाटकातील कलबुर्गीमधील सदर 76 वर्षीय वृद्धाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सदर व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे असा संशय असल्याची माहिती सरकारनं दिली गेली होती. परंतु अद्याप या व्यक्तीचा वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर आलेला नाही. वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर नेमकं सत्य काय आहे ते समजलेच.

PTI या वृत्तसंस्थेनंही ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये कोरोनाग्रस्त असल्याचा संशय असलेल्या 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.