चीनमध्ये ‘कोरोना’ व्हायरसमुळं आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू, 1975 ‘आजारी’ तर 324 लोकांची प्रकृती ‘गंभीर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या मृतांची संख्या रविवारी 56 वर पोहोचली आहे. यासह, 1975 लोक या व्हायरसमुळे ग्रस्त असून यापैकी 324 लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती चीनी आरोग्य प्रशासनाने यावेळी दिली. चीनमध्ये पसरलेल्या हा आजार न्यूमोनियाचा एक नवीन प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. ज्याचे नाव 2019-एनसीओव्ही ठेवले गेले आहे. चीनमध्ये आतापर्यंत या व्हायरसमुळे 56 जणांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही माहिती उपलब्ध करुन दिली आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 2684 लोक या आजाराला बळी पडले आहेत. या आजाराचे केंद्र वुहान आणि हुबेई प्रांतातील इतर 17 शहरांमध्ये नोंदविले जात आहे, जिथे या व्हायरसने सर्वाधिक लोकांचा बळी घेतला आहे. परंतु आता अशा प्रकारची प्रकरणे बीजिंगसह चीनच्या इतर प्रांत आणि शहरांमध्ये झपाट्याने पसरत आहेत.

25 जानेवारी पर्यंत हुबेई प्रांतात 323 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. येथे आणखी 13 मृत्यूची नोंद झाली आहे. 25 जानेवारीपर्यंत प्रांतात एकूण 1052 रुग्ण आढळले असून त्यापैकी 129 प्रकृती गंभीर आहे. येथे 52 लोकांचा यात बळी गेला आहे.  बीजिंगमध्ये शनिवारी कोरोनाव्हायरसचे दहा नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर शहरात या आजाराने पीडित लोकांची संख्या 51 वर पोहोचली आहे. या परिस्थिती दरम्यानअध्यक्ष शी जिनपिंग यांनी शनिवारी म्हटले की, चीन एक गंभीर परिस्थितीला तोंड देत आहे, परंतु त्याचवेळी कोरोना व्हायरसविरुद्धची ही लढाई चीन जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच  स्प्रिंग फेस्टिव्हल या चिनी नवीन वर्षाच्या  निमिताने आयोजीत  बैठकीचे अध्यक्ष असताना शी म्हणाले, “जोपर्यंत दृढ विश्वास आणि वैज्ञानिक विचारांनी सामूहिक प्रयत्न करण्याची शक्ती देशात आहे, तोपर्यंत आम्ही विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांवर विजय मिळवू.”

सार्स सारख्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांना गती देऊन चीनने येत्या 15 दिवसांत वुहानमध्ये 1300 खाटांचे आणखी एक तात्पुरते रुग्णालय बांधण्याची घोषणा रविवारी केली. सध्या शहरात एक हजार खाटांचे रुग्णालय आधीच बांधले जात आहे, ज्यांचे काम दहा दिवसांत पूर्ण होईल. चीन ज्या पद्धतीने युद्धपातळीवर रुग्णालये बांधण्यात गुंतला आहे, त्यावरून त्याला या आजाराची तीव्रता जाणवत असल्याचे दिसून येत असून अधिकाधिक रूग्णांच्या उपचारासाठी चीन स्वत: ला तयार करीत आहे. हा विषाणू गुरुवारी हाँगकाँग, मकाऊ, नेपाळ, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड, व्हिएतनाम आणि अमेरिकेत पोहोचला आहे. शुक्रवारी जपानने अशाप्रकारच्या आणखी एका घटनेची पुष्टी केली आहे.
फेसबुक पेज लाईक करा –