Corona Virus : भारताची ‘कोरोना’ व्हायरसवर मात, चीनमध्ये ‘प्रकोप’ सुरूच, मृतांची संख्या 1700 च्या ‘पार’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – कोरोना व्हायरसचे संकट अजूनही कमी होण्याचे नाव घेत नाही. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार चीनी सरकारने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसने मरणार्‍यांची संख्या आता वाढून 1765 झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मागच्या वर्षी हा आजार समोर आल्याने आणि त्यास जबाबदार असलेल्या कोरोना व्हायरसमुळे या आजाराला कोविड-19 नाव दिले आहे. दरम्यान वुहानवरून भारतात परतलेल्या 406 लोकांचे नमुने नेगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, भारताने कोरोना व्हायरसवर मात केली आहे. केरळमधील 3 रुग्णांची प्रकृती एकदम बरी आहे.

चीनच्या वुहानमधून भारत तिबेट सीमा पोलीसांच्या (आयटीबीपी) छावला येथे तयार केंद्रात ठेवलेल्या 406 लोकांमध्ये कोरोना व्हायरस आढळलेला नाही. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यांना आता येथून बाहेर काढण्याचे काम आजपासून सुरू होणार आहे.

केरळमधील दुसर्‍या रूग्णालाही सोडण्यात आले आणि आता केवळ एकाच रूग्णावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी देखील एक रूग्ण बरा होऊन घरी गेला आहे. आता देशात केवळ एकच कोरोना पीडित व्यक्ती आहे आणि त्याच्यावर त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

भारत लवकरच चीनला औषधे पाठवणार
भारत लवकरच चीनला औषधांची मदत पाठवणार असल्याचे येथील भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी सांगितले. चीनमध्ये कारोनो व्हायरसचा प्रभाव असाच राहिल्यात लवकरच भारतात सुद्धा औषधांची कमतरता भासू शकते. कारण चीनमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल केला जातो. पॅरासिटामोल, आयबूप्रोफेन, काही अँटीबायोटिक्स तसेच डायबिटिजच्या औषधांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोरानामुळे स्मार्टफोन तसेच सौर ऊर्जा उपकरणांच्या उत्पादनांवर याआधीच परिणाम झाला आहे. भारतीय औषध कंपन्यांना 70 टक्के कच्चा माल चीनकडून येतो.

जपानमध्ये कार्यरत भारतीय दूतावासाने सांगितले की, भारत याकोहामा किनार्‍यावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजातील प्रत्येक भारतीयाला सुरक्षित घरी आणण्यास मदत करणार आहे. कोरोनाची शेवटची टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल. या जहाजावर एकुण 3711 प्रवाशी असून त्यामध्ये 138 भारतीय आहेत. यातील कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 355 झाली आहे. नेपाळने देखील चीनमधील आपल्या 175 नागरिकांना बाहेर काढले आहे.  यामध्ये 134 पुरुष आणि 41 महिला आहेत. हे लोक सकाळी चार वाजाता येथील विमानतळावर पोहचले. यामध्ये 170 विद्यार्थी आहेत जे वुहानमध्ये शिकत आहेत. या सर्वांना 14 ते 17 दिवसांपर्यंत खरिपाटी सेंटरमध्ये देखरेखीखाली वेगळे ठेवण्यात आले आहे.

You might also like