‘कोरोना’मुळे तब्बल 3 हजार 486 भारतीयांचे मृतदेह मायभूमीच्या प्रतीक्षेत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना मृत्यूनंतर संसर्गाची भीती असल्याने मृतदेहाचे अंत्यसंस्कारसुद्धा कुटुंबीयांना पाहता येत नाही. त्यातच आता परदेशात असताना मृत्यू झालेल्या 3 हजार 486 भारतीयांचे मृतदेह अजूनही मायभूमीच्या प्रतीक्षेत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेली यासंबंधीची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे. देशातून मोठ्या प्रमाणावर नागरिक नोकरी धंद्यासाठी इतर देशात स्थंलातर केले आहे. मात्र कोरोना परिस्थितीमुळे अंत्यसंस्कारासाठीही त्यांच्या नातलगांना संधी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना कालावधीत 1 फेब्रुवारी ते 15 ऑगस्टदरम्यान 10 देशांमध्ये 5286 भारतीयांचा मृत्यू झाला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होती. देशांतर्गतही लॉकडाऊन होता. 5 हजारांपैकी अगदी थोड्यांचे शव मायभूमीत पोहोचू शकली. प्रतीक्षेत असलेल्यांचे मृतदेह मायदेशी आणायचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. कोरोनाची साथ संपूर्ण जगभरात पसरली आहे. आतापर्यत कोरोनामुळे अनेक लोकांनी जीव गमावला आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या 5286 भारतीयांच्या मृत्यूपैकी सर्वाधिक मृत्यू अरब जगात गेलेल्यांचे आहेत.

कोरोनाची भीती आणि लॉकडाउनमुळे खूप कमी भारतीयांची शव अंत्यसंस्कारासाठी भारतात आणली गेली. सौदी अरेबियात झालेल्या 2360 मृत्यूंपैकी फक्त 357 मृतदेह भारतात येऊ शकले. संयुक्त अरब अमिराती मध्ये 1441 मृत्यू झाले. त्यापैकी फक्त 704 शव मायभूमीत दफन होऊ शकली. कुवैतमधून 694 पैकी 356 मृतदेह भारतात आणला आले. ओमानमधून 336 पैकी 163 मृतदेह भारतात आणले गेले, कतारमधून 238 पैकी 148, बहारीनमध्ये 176पैकी फक्त 64 तर चीनमध्ये झालेल्या 20 भारतीयांच्या मृत्यूपैकी केवळ 6 मृतदेह भारतात आणणे शक्य झाले आहे.