अविश्वसनीय ! ना ‘लॉकडाऊन’ न बाजार बंद, तरी देखील ‘या’ देशानं ‘कोरोना’ला हरवलं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – चीनचा शेजारी देश, वुहानमध्ये कोरोना पसरला तेथून हा देश फक्त 1382 किलोमीटर दूर. परंतु या देशाने कोरोनाला हरवलं, कोरोनावर मात केली. या देशातील लोकांनी कोरोनाला हरवण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या, ज्याचं फळ म्हणून आज या देशात कोरोना नियंत्रणात आला, या देशाने संपूर्ण जगासमोर एक आदर्श ठेवला.

या देशाचं नाव आहे दक्षिण कोरिया. आज दक्षिण कोरिया कोरोना संक्रमित देशांच्या यादीत 8 व्या स्थानी आहे. आतापर्यंत येथे संक्रमणाची 9137 प्रकरणं समोर आली होती, यातील 3500 पेक्षा जास्त लोक बरे झाले. 129 लोकांचा मृत्यू झाला तर 59 लोकांची प्रकृती गंभीर आहे.

पहिल्यांदा परिस्थिती अशी नव्हती, 8 – 9 मार्चला येथे संक्रमित लोकांचा आकडा 8000 होता. परंतु मागील दोन दिवसात येथे फक्त 12 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. विशेष काय तर आजपर्यंत या देशात ना की लॉकडाऊन करण्यात आले ना की बाजार बंद राहिले.

द. कोरियाचे परराष्ट्र मंत्री कांग युंग वा म्हणाले, लवकरात लवकर चाचण्या आणि उत्तम उपचार यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी कमी होत गेली. यामुळे मृत्यू देखील कमी झाले. आम्ही 600 पेक्षा जास्त टेस्टिंग सेंटर सुरु केले. 50 पेक्षा जास्त ड्रायविंग स्टेशनवर स्क्रिनिंग केले.

कांग युंग वा म्हणाले, रिमोट टेम्प्रेचर स्कॅनर आणि घशासंबंधित आजार समजून घेतले. ज्याला जवळपास 10 मिनिटं लागली. 1 तासात रिपोर्ट आले. ज्यामुळे ताप आलेल्या पीडितांची तात्काळ माहिती उपलब्ध झाली. येथील सरकारने संक्रमणाची तपासणी करण्यासाठी मोठ मोठ्या इमारती, पार्किंग आणि सार्वजनिक ठिकाणी थर्मल इमेजिंग कॅमेरे लावले, ज्यामुळे ताप आलेल्यांची ओळख होईल.

हॉटेल आणि रेस्टॉरेंटमध्ये तापाची तपासणी करण्यात आल्यानंतर ग्राहकांना आत सोडले जात होते. द. कोरियाच्या तज्ज्ञांनी लोकांना संक्रमणापासून वाचण्यासाठी हातांच्या वापराची देखील पद्धत सांगितली. ही पद्धत अत्यंत नवीन होती, जर येथे एखादा व्यक्ती उजव्या हाताने काम करत असेल तर त्याला मोबाइल हाताळणे, दरवाजाचे हॅंडेल पकडणे आणि दुसऱ्या छोट्या मोठ्या कामांसाठी डाव्या हाताचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला. डाव्या हाताने काम करणाऱ्यांसाठी याच्या उलट.