अजित पवारांचा अतिवृष्टीचा पाहणी दौरा रद्द, ‘या’ कारणामुळे दिवसभर घरीच करणार विश्रांती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचं संकट उभं ठाकलं आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray), विरोधी पक्षनते दवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सगळेच नेते अतिवृष्टी झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. मात्र नेहमी ग्राऊंडवर काम करणारे अजित पवारांनी (Ajit Pawar) अतिवृष्टी पाहणी दौरा टाळला आहे. अजित पवार यांना ताप अन् कणकण जाणवत असल्याने त्यांनी घरीच विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार यांची कोरोना (Corona) चाचणी करण्यात आली आहे. सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. अजित पवारांच्या कोरोना चाचणीबाबत विविध चर्चा सुरु होत्या. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या अजित पवार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच थांबून विश्रांती घेत आहेत. शनिवारी अजित पवारांनी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती.

परतीच्या पावसाने पुराची परिस्थिती निर्माण झाली. पुरामुळे बाधित रस्ते, पुलांच्या दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. पंढरपूर येथील दौरा आटोपल्यानंतर अजित पवारांना कणकण जाणवू लागली. त्यानंतर त्यांना ताप आला. अजित पवारांनी कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला, परंतु खबरदारी म्हणून अजित पवार घरीच राहून विश्रांती घेणार आहेत.

You might also like