Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या दहशतीमुळं मक्का ‘रिकामं’ झालं, जगातील ‘ही’ शहरं देखील ओस पडली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 4 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूने जगातील ११3 देशांना घेरले आहे. त्यामुळे बरेच मोठ्या शहरांमध्ये शांतता पसरली आहे. मुस्लिमांचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ मक्काच्या काबाकडे पाहिले तर ही जागा स्वच्छ करण्यासाठी ती काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती.

मक्कामधील अल-हरम आणि मदीनामधील अल-मस्जिद अल-नबवी मशिदी पुन्हा उघडण्यात आली आहे. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे लोक पवित्र ‘उमराह’कडे कमी प्रमाणात जात आहेत. त्याचबरोबर भारतातील अमृतसर शहर सुवर्ण मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथील विमानतळावर नेहमीच गर्दी असते परंतु याक्षणी तिथे शांतता पसरली आहे.

सौदी अरेबियाने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या आठवड्यात उमराहसाठी जारी केलेला व्हिसा रद्द केला होता. कारण सौदी अरेबियामध्ये कोरोनो विषाणूची पुष्टी झाली आहे. ज्या नागरिकांमध्ये हा विषाणू आढळला होता तो नागरिक इराणहून परतला होता. जिथे कोरोना विषाणूमुळे खळबळ उडाली होती. तेथे आतापर्यंत बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला आहे.

इटलीत 25 टक्के लोकसंख्या कोरोनामुळे त्रस्त आहे. चीननंतर इटली हा असा देश आहे जिथे कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक 827 लोक मरण पावले आहेत. येथे सुमारे 12 हजारांहून अधिक लोक संसर्गित आहेत. व्हेनिसचे प्रसिद्ध सेंट मार्क स्क्वेअरमध्येही शांतता पसरली आहे. येथे दररोज 30 हजाराहून अधिक पर्यटक येत असतात. जपानची राजधानी टोकियोचे शॉपिंग हब गिन्जा देखील ओसाड पडले आहे.

अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत आहे. हे पाहता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महिन्यापासून सर्व युरोपियन देशांमधून अमेरिकेचा प्रवास थांबविला आहे. तथापि, या बंदीमध्ये ब्रिटनचा समावेश नाही.

ब्रिटनमध्येही कोरोना विषाणूचा कहर आहे. येथे आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथे आतापर्यंत 26,000 लोकांच्या संसर्गाची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 373 घटनांमध्ये संसर्गाची पुष्टी झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यूकेच्या आरोग्यमंत्री नदीन डोरिस ह्या देखील कोरोना व्हायरसचे शिकार झाल्या आहेत.

चीनमध्ये जिथे कोरोना विषाणूची सुरुवात झाली तेथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आतापर्यंत येथे 3 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. इथल्या बर्‍याच शहरांमध्ये व्यवसाय ठप्प आहे. अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. इराणमध्ये मध्य आशियात कोरोना विषाणूचे रुग्ण सर्वाधिक आहेत. येथे 9 हजार लोक संक्रमित आहेत तर 354 लोकांचा येथे मृत्यू झाला आहे.