Coronavirus in Dharavi : हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं थोपवली ‘कोरोना’ची दुसरी लाट, रविवारी आढळले एवढे रुग्ण

मुंबई : ऑनलाइन टीम  मुंबईत कोरोनाचा (Corona in Mumbai) जोर ओसरत असताना धारावीतूनही (Dharavi) सकारात्मक बातमी (News) समोर येत आहे. कोरोना संसर्गाच्या (Corona infection) पहिल्या लाटेत हॉटस्पॉट (Hotspot) ठरलेल्या धारावीनं (Dharavi) कोरोनाची दुसरी लाट थोपवून धरली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी (largest slum in Asia) असलेल्या धारावीत पहिल्या लाटेच्या सुरुवातीला थैमान घातलं होतं. मात्र नंतरच्या काळात पालिकेच्या उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.

दुसरी लाट रोखण्यात यश

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्यांदा प्रादुर्भाव वाढल्यानंतर धारावीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.
परंतु या दुसऱ्या लाटेतही कोरोनाला रोखण्यात धारावीला यश आलं आहे.
रविवारी धारावीत केवळ 2 रुग्ण आढळून आले आहेत  तर, सध्या धारावीत एकूण 6 हजार 835 रुग्ण आहेत.
6 हजार 456 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या फक्त 20 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Guidelines For Corona Treatment : कोरोना उपचाराबाबत केंद्राकडून नवीन गाईडलाईन जारी ! आता ना वाफ घ्यायचीय, ना कोणती व्हिटॅमिनची गोळी

दादरमध्ये रविवारी 8 रुग्ण

दादरमध्ये रविवारी (दि.6) 8 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या 9 हजार 487 वर पोहचली आहे. माहीममध्ये 12 नवे रुग्ण सापडले असून सध्या 201 सक्रीय रुग्ण (Active patient) उपचार घेत आहेत.

या भागात रुग्ण संख्या घटली

मुंबई महानगरपालिकेचा (BMC) जी उत्तर विभागात म्हणजे, धारावी, माहिम या भागात रविवारी 22 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जी उत्तर विभागातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 26 हजार 148 वर पोहचली आहे. या भागात सध्या 374 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 25 हजार 29 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.