Coronavirus : मुलीला वाचवणार्‍या डॉक्टरचे मानले आभार, वडिलांनी दिलेलं 10 लाखाचं बक्षीस नाकारलं

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळ्यात 19 वर्षांच्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे काळताच बापाच्या काळजात धस्स झाले होते. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी या तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी नेत कुटुंबियांना क्वारंटाइन केले. या घटनेनंतर मुलीचे काय होईल या विचाराने बापाचा बांध फुटला. उपचारानंतर लेकीसाठी बापाने डॉक्टरला थेट 10 लाखांचा चेक देण्याचा पृयत्न केला. मात्र, डॉक्टरने बक्षीस नाकारत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

तरुणीच्या वडिलांनी डॉक्टरांना तुम्हीच देव असल्याचे म्हणत 10 लाख रुपयांचा चेक त्यांच्यासमोर ठेवला. यापैकी तुम्हाला हवे तेवढे घ्या असे म्हणत त्यांनी डॉक्टरसमोर हात जोडले. मात्र, डॉ सुनील पुंड यांनी त्यांची समजूत काढत मला पैसे नकोत. माझे हे कर्तव्य असल्याचे सांगितले. माझ्या मुलीसारखी मी तिची काळजी घेतली यातच मला समाधान आहे. वडिलांना हे ऋण कसे फेडावे हे समजेना, मात्र डॉक्टरांनी त्यांची समजूत काढली. बक्षिसापेक्षा शासकीय सेवेतून मिळणारे समाधान खूप मोठे असल्याचे डॉ. सुनील पुंड म्हणाले.