काय सांगता ! होय, ‘या’ देशात ‘कोरोना’ पॉझिटिव्ह झाल्यास मिळतील 94 हजार रुपये

कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या एका राज्याने ठरवले आहे की, कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होणार्‍या प्रत्येक व्यक्तीला सुमारे 94 हजार रुपये दिले जातील. लोकांना खाण्याचा खर्च, भाडे आणि फोनचे बिल चुकवण्यासाठी मदत म्हणून हे पैसे दिले जात आहेत.

कॅलिफोर्नियाच्या अलामेडा राज्याच्या सुपरवायझर्स बोर्डचे म्हणणे आहे की, संक्रमित झाल्यानंतर अनेक लोकांना दोन आठवड्यापर्यंत क्वारंटाइन आणि आयसोलेट राहणे परवडत नाही. या कारणामुळे त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉस एंजलिस टाइम्सच्या रिपोर्टनुसार, राज्याच्या बोर्डाने सर्वसंमतीने पायलट प्रोग्राम अंतर्गत कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर 94 हजार रुपये देण्यााचा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की, जर लोक टेस्ट करण्यास घाबरू लागले किंवा आयसोलेट होऊ शकले नाहीत तर व्हायरस रोखण्याची योजना यशस्वी होणार नाही.

94 हजार रुपयांची मदत घेण्यासाठी व्यक्तीला संबंधित क्लिनिकमध्ये टेस्ट करावी लागेल. तसेच व्यक्तीला पेड सिक लिव्ह मिळत नसावी आणि बेरोजगार भत्ता घेणारा व्यक्ती नसावा, अशा अटी यामध्ये आहेत.

अमेरिकेच्या अलामेडा राज्याला आशा आहे की, नव्या निर्णयानंतर संक्रमित झाल्यानंतर लोक स्वता आयसोलेट होण्यासाठी प्रेरित होतील. यामुळे टेस्ट करण्यासाठी सुद्धा जास्त लोक येतील.