Coronavirus : मायकल जॅक्सनला ‘कोरोना’ व्हायरसबद्दल सारं काही माहिती होतं ? बॉडीगार्डचा दावा

पोलीसनामा ऑनलाईन :मायकल जॅक्सन जगप्रसिद्ध डान्सर आहे. त्याला पॉप साँग आणि ब्रेक डान्ससाठी ओळखलं जातं. आता अशा बातम्या समोर येताना दिसत आहे की, मायकलला कोरोना व्हायरससारख्या अशा जागितक महामारींबद्दल माहिती होतं. मायकलच्या एका बॉडीगार्डनं याबाबत दावा केला आहे. बॉडीगार्डनं सांगितलं हेच कारण होतं की, त्याची खिल्ली उडवल्यानंतरही मायकल फेस मास्क लावत असे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मॅट फिड्स असं या मायकलच्या बॉडीगार्डचं नाव आहे. मॅटनं मायकल जॅक्सनसोबत अनेक वर्षे काढली आहे. मॅटनं सांगितलं की, इथं आधीपासूनच नैसर्गिक संकट आहे हे मायकलला माहिती होतं. ते नेहमीच जागरूक असायचे. ते नेहमीच असे सांगयाचे की, आपल्याला कोणत्याही क्षणी मिटवलं जाऊ शकतं. एक कीटाणू आहे जो पसरत आहे. हा कधीही एकाच वेळेस चार देशात जाऊ शकतो. तो एअरोप्लेन्समध्ये नेहमीच लोकांसोबत आहे.”

View this post on Instagram

Be smart and stay safe!

A post shared by Michael Jackson (@michaeljackson) on

मॅट पुढं म्हणाला, “मी जेव्हा मास्कवरून त्यांची गंमत करायचो आणि हे घालू नका असं सांगायचो तेव्हा ते म्हणायचे मी असं करू शकत नाही. नाहीतर मी आजारी पडेल. मी काहीतरी कारणानं पृथ्वीवर आहे. मी माझा आवाज खराब करू शकत नाही. मला निरोगी राहिलं पाहिजे. मी माझा आजार कोणालाही पास ऑन करू शकतो असं ते म्हणायचे. ते जर आज जिवंत असते तर हेच बोलले असते जे मी सांगत आहे.” असंही मॅट म्हणाला.

You might also like