Coronavirus Dite Tips : ‘कोरोना’ काळात जेवणानंतर जरूर खा ‘हे’ फळ, शरीर होईल मजबूत, व्हायरसशी लढण्यास होईल मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एक्सपर्ट सांगतात चांगल्या डाएटने इम्यूनिटी सिस्टम मजबूत बनवता येऊ शकते. यासाठी तुमच्या डाएटमध्ये फळांचा राजा आंब्याचा समावेश करा. आंबा आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. आंबा तुम्ही सकाळी नाश्त्यात किंवा दुपारी जेवणासोबत खाऊ शकता. मात्र, याचे अतिसेवन केल्याने शरीराचे नुकसान सुद्धा होऊ शकते. शक्तो रात्री आंबा खाऊ नका.

खाण्याचे प्रमाण

* आंब्यासोबत काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.
* आंब्यात नैसर्गिक साखर असते, यामुळे साखर टाकू नका.
* ज्यांना अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* आंब्यात फायबर जास्त असल्याने अतिसेवनाने अतिसार होऊ शकतो
* अतिसेवनाने शरीराची उष्णता वाढू शकते.
* दिवसातून एकदाच आंबा खा.

हे आहेत फायदे

1 पचनशक्ती सुधारते

आंब्यात फायबर असल्याने पचनशक्ती चांगली होते. आतड्यांची स्वच्छता होते. शौचाला साफ होते. बद्धकोष्ठता दूर होते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार दूर राहतात.

2 इम्यून होते मजबूत

आंबा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. जर पोट ठिक असेल तर शरीराचे इम्यून बूस्ट होईल.

3 कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते. खराब कोलेस्ट्रॉल ठिक होतात.

4 रक्ताभिसरण

पोटॅशियमची मात्रा जास्त असल्याने रक्ताभिसरण चांगले होते.

5 हार्टबीट आणि ब्लड प्रेशर

हार्टबीट आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. ज्यामुळे हृदरोगापासून बचाव होतो.

6 आयर्नचा चांगला स्त्रोत

रक्त वाढते. आंब्यात आयर्न असल्याने कमतरता दूर होते. अ‍ॅनीमियाच्या रूग्णांनी याचे सेवन करावे. गरोदर महिलांसाठी आंबा आयर्नचा चांगला स्त्रोत आहे.