‘कोरोना’विरूध्द लढण्यासाठी दररोज किती विटामिन-C आवश्यक, ‘या’ 10 गोष्टींमध्ये असतं भरपूर Vitamin-C, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –  व्हिटॅमिन सी ला एस्कॉर्बिक अ‍ॅसिड म्हणून देखील ओळखले जाते. याच्या कमतरतेमुळे स्कर्वी रोग होऊ शकतो. या रोगात कमजोरी, थकवा, रक्ताची कमतरता, श्वासाचा त्रास, जखम नर भरणे, मूडमध्ये बदल आणि औदासिन्य अशी लक्षणे जाणवतात. शरीर व्हिटॅमिन सी ची निर्मिती करू शकत नाही, यासाठी याची पूर्तता करणार्‍या वस्तूंचे सेवन नियमित केले पाहिजे.

व्हिटॅमिन सी युक्त वस्तू सेवन केल्याने इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते आणि कोरोनाशी लढण्यात मदत होते. रोग प्रतिकारशक्ती मजबूत नसल्यास कोरोनाचा धोका वाढतो. व्हिटॅमिन सी तुमच्या टी-पेशींना मजबूत करते आणि जास्त पेशी तयार करण्यात मदत करते. व्हिटॅमिन सी निरोगी पेशींना जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे सर्दी कमी होते, गंभीर समस्या दूर करण्यास मदत होते.

दररोज किती व्हिटॅमिन सी ची आवश्यकता

वय पुरुष महिला गर्भावस्था
0-6 महीने 40 मिलीग्रॅम 40 मिलीग्रॅम
7-12 महीने 50 मिलीग्रॅम 50 मिलीग्रॅम
1-3 वर्ष 15 मिलीग्रॅम 15 मिलीग्रॅम
4-8 वर्ष 25 मिलीग्रॅम 25 मिलीग्रॅम
9-13 वर्ष 45 मिलीग्रॅम 45 मिलीग्रॅम
14-18 वर्ष 75 मिलीग्रॅम 65 मिलीग्रॅम 80 मिलीग्रॅम
19+ वर्ष 90 मिलीग्रॅम 75 मिलीग्रॅम 85 मिलीग्रॅम

यातून मिळते भरपूर व्हिटॅमिन सी
1. संत्रे 2. पिकलेली फळे 3. स्ट्रॉबेरी 4. ब्रोकोली 5. ब्रसल स्प्राउट 6. पालक 7. कोबी 8. लाल आणि हिरवी मिरची 9. बटाटा 10. संत्रा ज्यूस