Diet Tips : ‘कोरोना’ काळात लंच नंतर आवश्य खा ‘ही’ गोष्ट, शरीर होईल आतून मजबूत अन् व्हायरसपासून मिळेल संरक्षण

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात व्हायरसशी लढण्यासाठी शरीराला आतून आणि बाहेरून मजबूत बनवणे आवश्यक आहे. यासाठी खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही आज असा एक पदार्थ सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या जेवणाचा स्वाद वाढेल आणि सोबतच आरोग्याचे अनेक फायदे होतील. हा पदार्थ आहे दही. यास सूपर फूड सुद्धा म्हटले जाते. दुपारच्या जेवणात एक वाटी दही आवश्य सेवन करा. यामुळे डायबिटीज, मुळव्याध, बद्धकोष्ठता यासारख्या गंभीर समस्यांमध्ये आराम मिळतो. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीनसह अनेक मिनरल्स असल्याने विविध आजार दूर राहतात. दुपारच्या जेवणात वाटीभर दही खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

1) वजन कमी होते
योग्य पोषकतत्व मिळाल्याने सारखी भूक लागत नाही. यातील कॅल्शियम आणि प्रोटीन फॅट कमी करण्यास मदत करते.

2) हृदय राहाते निरोगी
रोज दही खाल्ल्याने हृदय निरोगी राहाते. अनेक आजारांपासून बचाव होतो. कोलेस्ट्रोलची मात्र कमी होते.

3) इम्युनिटी सिस्टम
दुपारी वाटीभर दही खाल्लयाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

4) हाडे मजबूत होतात
व्हिटॅमिन ए, डी, आणि बी-12 युक्त एक वाटी दह्यात 100 ग्रॅम फॅट आणि 98 ग्रॅम कॅलरी आहे. यात कॅल्शियम भरपूर असल्याने हाडे मजबूत होतात.

5) ब्लड कंट्रोल
दही शरीरातून अतिरिक्त पोटॅशियम बाहेर काढते, यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. यातील प्रोबायोटिक कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. हृदयाच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे.

6) डोकेदुखी
यातील विविध पोषकतत्वांमुळे डोकेदुखीची समस्या दूर होते.

7) मुळव्याध
दह्यात भाजलेले जीरे, मीठ आणि काळीमिरी टाकून रोज सेवन केल्यास मुळव्याधीत आराम मिळतो.

8) उष्णतेपासून बचाव
उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणात दही खाल्ल्यास गरमीच्या समस्या दूर होतात. शरीराला ताजेपण आणि थंडावा मिळतो.