PM मोदींच्या ‘त्या’ आवहानानंतर नेटकर्‍यांच्या Trends मध्ये आली ‘दिवाळी’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा असे आवाहन केले आहे. कोरोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी आपण सर्वांना एकत्र आले पाहिजे.

त्यामुळेच आपण सर्वांनी रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सगळे लाइट्स बंद करुन घराच्या दारात किंवा बाल्कनीमध्ये एक दिवा, मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावावी अशा शब्दांमध्ये मोदींनी हे आवाहन केले. मात्र यानंतर ट्विटवर लगेचच नेटकर्‍यांनी लगेच दिवाळी शब्द ट्रेण्ड होऊ लागला आहे. काही मिनिटांमध्ये या शब्दाचा समावेश असणारे हजारो ट्विट्स पडले आहेत.

अनेकांनी मोदींनी केलेल आवाहन हे अंध:कार घालवण्यासाठी आहे दिवाळी साजरी करण्यास सांगितलेले नाही असा टोला अतिउत्साही लोकांना लगावला आहे. 22 मार्च रोजी मोदींनी अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍यांसाठी थाळीनाद करण्यास सांगितले होते त्यावेळी देशातील अनेक भागांमध्ये लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडत एकत्र येत थाळीनाद केला होता. मात्र ही चूक पुन्हा करु नका आपल्या घरामध्येच दिवे लावा असे आवाहन मोदींनी केले आहे. काहींनी यावरुन मिम्सच्या माध्यमातून या आवहानावर भाष्य केले आहे.