Coronavirus : कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर लगेच करू नका ‘रोमान्स’ करण्याची घाई, ‘संभोग’ करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाचा संसर्ग झालेल्या पुरुषांच्या शुक्राणूमध्ये विषाणू सापडल्यानंतर लोकांना शारीरिक संबंधासंदर्भात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जर कोणा लोकांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली तरी बरे झाल्यानंतर त्यांनी शारीरिक संबंध ठेऊ नये. असे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

कोरोना संक्रमातून बरे झालेल्या काही लोकांनी पुढील काही दिवस शारीरिक संबंध ठेऊ नये असे थायलंडच्या डिजीज कंट्रोल डिपार्टमेंटचे सीनिअर मेडिकल तज्ज्ञाकडून सांगण्यात आले आहे. तर शुक्राणूमध्ये कोरोना विषाणू असू शकतात. कारण कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांच्या शुक्राणूमध्ये देखील असा इशारा चीनमध्ये करण्यात आलेला एका संशोधनातून समोर आला आहे.

कोरोनातून बरे झाल्यावर काही दिवसांपर्यंत चुंबन घेणे थांबवले पाहिजे. जवळपास ३० दिवसांपर्यंत चुंबनआणि शारीरिक संबंध ठेवणे हे हे लोकांनी टाळले पाहिजे असे थायलंडचे तज्ज्ञ वीरावत मनोसुट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच काही लोकांना कोरोना झाला असेल तर बरे होऊन पुन्हा कोरोना झाला तर ३० दिवसानंतर तुम्ही शारीरिक संबंध ठेवत असाल कंडोमचा वापर नक्की करा. असे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

या दरम्यान, चीनच्या संशोधनानुसार, ३३ रूग्णांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यामधील १५ रुग्णालयात होते तर २३ कोरोनातून बरे झालेले होते. ज्यावेळी सॅम्पलची तपासणी करण्यात आली. त्यावेळी यामधील एकूण ६ लोकांच्या शुक्राणूमध्ये कोरोना विषाणू आढळून आले. ठीक झाल्यानंतर व्हायरस काही दिवसांपर्यंत शरीरात राहू शकतो आणि शारीरिक संबंधाच्या माध्यमातून संसर्ग पसरू शकतो. तर JAMA नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात अभ्यासक शिजी झांग म्हणाले की, शक्यता आहे की ठीक झालेले रूग्णही दुसऱ्यांमध्ये संसर्ग पसरवू शकतात. तसेच, ज्या पुरूषांमध्ये संप्रेरकचा स्तर कमी असतो. अशा रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. टेस्टोस्टेरॉन हा शारीरिक संबंधाशी निगडीत हार्मोन आहे. असे जर्मनच्या एका संशोधनात समोर आपले आहे.