Coronavirus : ‘कोरोना’बाधीत महिलेच्या संपर्कात आलेले 1 डाॅक्टर व 2 नर्स ‘पोझिटीव्ह’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – उरुळी कांचन येथील कोरोना बाधित महिला लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना तिच्या संपर्कात आलेल्या एक्कावन जणापैकी एक डाॅक्टर सह दोन नर्स अशा तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्व हवेलीतील कोरोनाचा शिरकाव उरुळी कांचन येथून झाला एका महिलेचा अहवाल लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना प्राप्त झाला त्यानंतर त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या डाॅक्टर परिचारिका प्रयोगशाळा तज्ञ स्वच्छता कर्मचार्यासह अन्य अशा एक्कावन जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यात पंचेचाळीस जणांच अहवाल निगेटीव्ह आले तर तीन जणाचे पाॅजिटीव आले आहेत तीन जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.कोरोना बाधीत हाॅस्पिटल मधील तीन कर्मचारी विलगीकरण कक्षात ठेवले असून इतर हाॅस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर काॅरंटाईन केले आहेत. या बातमीनंतर संपूर्ण लोणी काळभोर मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी नागरिकांना घाबरु नको फक्त घरातुन बाहेर पडू नका आपण हा लढा नक्कीच जिंकू असे आवाहन केले आहे.