Coronavirus : लग्नाचा वाढदिवस नंतर पहिले डयुटी, ‘या’ डॉक्टर दाम्पत्याचं तुम्ही देखील कराल ‘कौतुक’

रांची, पोलिसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाचे संकट ओढवले असताना देवदूताप्रमाणे जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहणाऱ्या डॉक्टरांचे करावे तितके कौतुक कमीच आहे, कोरोनाबाधित रुग्णांनवर उपचार करताना अनेक डॉक्टरांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागला आहे. हे डॉक्टर कुटुंबापासून लांब राहून देशसेवेत स्वतःला वाहून नेत आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नुकतेच पुण्यात मेघा व्यास या तरुण डॉक्टर महिलेचा कोरोना रुग्णांवर उपचार करताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. स्वतःचा जीव धोक्यात घालून हि डॉक्टर मंडळी कोरोनाशी २ हात करण्यास सज्ज झाली आहेत .

रांची मध्ये एक डॉक्टर दाम्पत्याने आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस हा नर्सेस आणि रुग्णाबरोबर साजरा केला . १६ एप्रिल रोजी या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस होता . त्या दिवशी रुग्णालय काम करता करताच या दोघांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. निशांत पाठक यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत याची माहिती दिली. आमच्या लग्नाचा वाढदिवस होता पण केक आणि मित्रमैत्रीणी नव्हत्या. आम्ही तीन सहकारी आणि चार नर्ससोबत कोरोना वॉर्डमध्ये होतो असं निशांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.रुग्णांच्या चेहऱ्यांवर असलेलं हसू आमच्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट होतं. आम्हाला आशा आहे हे सर्व रुग्ण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकतील आणि हेच आमच्यासाठी खरं गिफ्ट असेल असे निशांत आणि रितिका पाठक यांनी म्हंटल आहे. रिम्समधील कोरोना सेंटरमध्ये निशांत आणि रितिका यांची 15 ते 22 एप्रिल या कालावधीत ड्युटी होती. त्यानंतर दोघांनाही एका हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आलं आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनीही डॉक्टर दाम्पत्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. निशांत पाठक आणि रितिका या दाम्पत्यांच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांनवर उपचार केल्यांनतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.