Coronavirus : डॉक्टर मास्क घालून 35 KM धावले, सांगितलं काय होतो परिणाम ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी जगभरात मास्क घालण्यावर जोर दिला जात आहे, परंतु असेही अनेक लोक आहेत, जे मास्क घालण्यास विरोध करतात. अशाच लोकांना उत्तर देण्यासाठी एका डॉक्टरने मास्क घालून सुमारे 35 किमीची धाव घेतली.

ब्रिटनच्या या डॉक्टरांनी मास्क घालून 35 किमीची धाव पूर्ण केली. या दरम्यान ते एका डिव्हाइसद्वारे स्वताच्या ऑक्सीजन लेव्हची सुद्धा तपासणी करत होते. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, डॉक्टर टॉम लॉटन यांचे म्हणणे आहे की, मास्क घालून धावूनही ऑक्सीजन लेव्हलमध्ये घसरण झाली नाही.

आयसीयूमध्ये मध्ये काम करणारे डॉक्टर टॉम लॉटन यांनी म्हटले की, धावण्या दरम्यान त्यांची ऑक्सीजन लेव्हल 98 टक्केपर्यंत होती. त्यांनी नंतर सांगितले की, लोकांना समजावे की मास्क सुरक्षित आहे आणि कोरोना व्हायरला रोखण्यासाठी आवश्यक आहे, पटवून देण्यासाठी मी हा उपक्रम राबवला.

मात्र, अनेक देशांमध्ये लोक मास्क अनिवार्य करण्याविरूद्ध आंदोलने सुद्धा करत आहेत. यामुळे सरकारांना सर्वांसाठी मास्क अनिवार्य करण्याचे धोरण लागू करण्यात अडचणी येत आहेत.

तर, आयसीयू डॉक्टर टॉम लॉटन यांचे म्हणणे आहे की, त्यांनी पाहिले आहे की, लोक मास्क घालून डेस्कवर बसून राहतात आणि म्हणतात की त्यांची ऑक्सीजन लेव्हल कमी झाली आहे. तर, आपल्या धावण्यात डॉक्टरांनी तीन लेयर कपड्याचा मास्क घातला होता. मात्र, त्यांनी देखील सांगितले की, केवळ मास्कने कोरोना नियंत्रणात आणता येणार नाही, तर सोशल डिस्टन्सिंग आणि आयसोलेशन सुद्धा जरूरी आहे.