Coronavirus : ‘कोरोना’ संदर्भात WHO नं चीनची ‘बाजू’ घेतली, पुर्वीच नाही दिला ‘इशारा’, डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘आरोप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश सुरु आहे. आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. दरम्यान, आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर मोठा आरोप केला आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, डब्ल्यूएचओने कोरोना विषाणूच्या विषयावर चीनची बाजू घेतली असून त्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. कोरोना विषाणू संदर्भात याआधीही संकटाची धोक्याची चाहूल होती. परंतु, डब्ल्यूएचओने ते लपवून ठेवले. जर डब्ल्यूएचओने आधीच याबाबत जागरूक केले असते तर इतक्या जणांचा जीव गेला नसता. व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषदे दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे आरोप केले.

दरम्यान, अमेरिकन कॉंग्रेसचे सदस्य ग्रेग यांनी आपल्या एका ट्विटमध्ये डब्ल्यूएचओवर आरोप केले होते, त्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला. अमेरिकन कॉंग्रेसच्या या आरोपात आता ट्रम्प यांनीही हो ला हो म्हंटले आहे. याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या विषयावर चीनला घेरले होते, एवढेच नव्हे ते त्याला ‘चिनी व्हायरस’ देखील म्हणत आहेत. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हा विषाणू चीनमधून आला आहे, चीनमुळे पसरला आहे आणि म्हणूनच याला चिनी व्हायरस म्हणावे लागेल.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. येथे राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे आणि आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. अमेरिकेत 67 हजाराहून अधिक सक्रिय प्रकरणे नोंदविली गेली आहेत, त्यामुळे तिथे सर्वात मोठा धोका आहे. तसेच जगभरात आतपर्यंत २० हजारांहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू आहेत, याशिवाय इराण, चीन, स्पेन आणि अमेरिकामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.