Coronavirus : डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, म्हणाले – ‘लवकरच चांगली बातमी देईन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूची लस बनविण्याची प्रक्रिया योग्य दिशेने सुरु असल्याचे अमरेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. शुक्रवारी त्यांनी सांगितले की काल कोरोना वॅक्सीन संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली. कोरोनावर वॅक्सीन बनवण्याच्या दिशेने मोठी प्रगती झाली आहे. ज्या पद्धतीने लस बनवण्याचे काम होत आहे, त्यानुसार लवकरच याबाबतीत चांगली बातमी आपल्याला मिळू शकेल.

ट्रम्प म्हणाले की, आम्ही जगातील प्रत्येकाबरोबर काम करत आहोत आणि आम्ही चीनबरोबर देखील काम करू. आम्ही सर्वांसोबत काम करू, पण जे घडले ते कधीच होऊ नये. ते पुढे म्हणाले की, कोरोना व्हायरस ही चीनची भेट आहे, ही खूप वाईट भेट आहे. चीनवर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याबद्दल संशय व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की, संक्रमण वुहानपासून सुरु झाले आणि त्या ठिकाणी कठीण परिस्थिती होती. परंतु हे चीनच्या इतर कोणत्याही भागात पसरले नाही.

ट्रम्प चिनविरुद्ध कठोर होत म्हटले की, चीन ने अमेरिकेचा प्रचंड फायदा घेतला आहे. आम्ही चीनच्या पुनर्बांधणीस मदत केली, आम्ही त्यांना वर्षाला 500 अब्ज डॉलर्स दिले. चीन आणि इतर अनेक देशांसह आमच्या देशांचे प्रतिनिधित्व करणारे किती मूर्ख आहेत ? पण आता हे सर्व काही बदलत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like