Coronavirus : ‘कोरोना’विरोधातील युद्धासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं डोनेट केले 25 कोटी, ट्विंकल खन्नाला माहिती होती स्क्रिप्ट

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार अक्षय कुमारनं कोरोनासोबत दोन हात हात करण्यासाठी 25 कोटी डोनेट केले आहेत. पीएम केअर्स फंडात डोनेट करून अक्षयनं मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनं अलीकडे काही सिक्रेट शेअर केले आहेत जे ऐकल्यानंतर तुम्हीही चकित व्हाल. लॉकडाऊन आणि क्वारंटाईनची जी परिस्थिती आज देशात आहे त्याची घोषणा ट्विंकल खन्नानं 2015 साली केली होती.

ट्विंकल खन्नानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. ट्विंकलनं नुकतीच एक इंस्टा पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं असा उल्लेख केला आहे की, 2015 मध्येच तिनं या परिस्थितीबद्दल सांगितलं होतं.

ट्विंकलनं इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात एक फोटो आहे. पोस्ट शेअर करत ट्विंकल म्हणाली की, ही एक रफ स्टोरी आयडिया होती जी मी माझे एडिटर चिक्की सरकार आणि जगरनॉट डॉट इन सोबत शेअर केली होती. हे ऑक्टोबर 2015 मध्ये बनवण्यात आलं होतं. त्यांनी हे अमान्य केलं होतं.

लग्नानंतर ट्विंकल खन्नां लेखणीला आपली साथीदार बनवलं होतं. लग्नानंतर तिनं बॉलिवूडला अलविदा केलं. तिनं सांगितलं होतं की, रायटींग आणि इंटेरियर डिझायानिंगमध्ये करिअर बनव्याचा निर्णय घेतला आहे.