‘कोरोना’चं औषध शोधून 3 प्रोफेसर रातोरात झाले 15-15 कोटी रूपयांचे मालक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगात सध्या सगळीकडे कोरोनाच्या लसीवर संशोधन चालू आहे. अशातच ब्रिटनमधील तीन विद्यापीठाचे प्राध्यापक कोरोनावर औषध शोधून रातोरात करोडपती झाले आहेत. प्राध्यापक रटको जुकानोविक, स्टीफन होलगेट आणि डोन्ना डेविस यांनी स्थापन केलेल्या Synairgen या कंपनीच्या शेअर किमतीत चांगलीच वाढ झाली आहे. आतापर्यंत शेअरची किंमत 3000 पटीने वाढली आहे.

प्राध्यापक रटको जुकानोविक, स्टीफन होलगेट और डोन्ना डेविस यांनी ‘सिनैरजेन’ नामक कंपनीची स्थापना केली होती. याच कंपनीने कोरोना व्हायरसवरील एका औषधाची चाचणी केली होती. या चाचणीत ज्या रुग्णांना कोरोनाची होण्याची मोठी शंका होती त्यातील 79 टक्के रुग्णांची तब्येत सावरली आहे.

साउथैंपटन विद्यापीठाच्या या तीन प्राध्यापकांनी काही वर्षांपूर्वी या औषधाचा शोध लावला होता. त्यांनी शोधलं होत की अस्थमा आणि क्रोनिक लंग या आजारांमध्ये रुग्णांमधील इंटरफेरोन बीटा नावाच्या प्रोटिनची(प्रथिनं) कमतरता असते. हे प्रोटिन सर्दीवर लढण्यासाठी मदत करते. प्राध्यापकांनी शोध लावला होता की, ज्या प्रोटिनची आवश्यकता आहे ती दिली तर त्या इन्फेक्शन विरुद्ध लढण्यास रुग्णाला मदत होते.

आपल्या संशोधनाला औषधात रूपांतर करण्यासाठी 2004 साली या तीन प्राध्यापकांनी Synairgen ही कंपनी काढली होती. नंतर ही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये आली होती. यावर्षी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर फेब्रुवारीमधेच Interferon Beta प्रोटीन असणाऱ्या SNG001 या औषधाची क्लिनिकल ट्रायल सुरू केली होती. या आठवड्यातच याचे निकलदेखील आले होते.

या ट्रायलच्या वेळेस रुग्णांच्या घशामध्ये थेट SNG001 हे औषध दिले गेले. यानंतर 2 ते 3 टक्क्यांनी रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढलं आहे. ट्रायलमध्ये 101 लोकांना घेतलं होतं. या ट्रायलचे 21 जुलैला निकाल प्रकाशित झाल्यावर Synairgen या कंपनीचे शेअरची किंमत चांगलीच वधारली आहे. त्यामुळे ही प्राध्यापक 15 ते 16 करोड रुपयांचे मालक झाले आहेत.