जनता कर्फ्यू : न रेल्वे धावणार आणि नाही विमान उड्डाण घेणार, जाणून घ्या काय-काय होणार बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसशी लण्यासाठी देशातील लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या अंतर्गत शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत देशातील अनेक सेवा बंद राहणार आहेत. या काळात कोण-कोणत्या गोष्टी बंद राहतील, ते जाणून घेवूयात.

शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत कोणत्याही स्टेशनवरून कोणतीही ट्रेन सुटणार नाही. मेल आणि एक्सप्रेस गाड्यासुद्धा रविवारी थांबतील. सर्व उपनगरीय ट्रेन सेवासुद्धा खुपच कमी करण्यात आल्या आहेत.

भारतीय रेल्वेने कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी विनाआवश्यक प्रवास टाळण्याच्या हेतूने आतापर्यंत 245 ट्रेन रद्द केल्या आहेत. सध्या देशात रोज 2,400 पॅसेंजर ट्रेन आणि 1,300 मेल व एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. आता रविवारी या 3,700 ट्रेन धावणार नाहीत. या गाड्यांसाठी अगोदरपासून केलेले बुकिंग रद्द समजण्यात येणार आहे. प्रवाशांना त्याचे पूर्ण रिफंड देण्यात येईल. कोरोना व्हायरस महामारीमुळे आयआरसीटीसीने सर्व मेल, एक्सप्रेस ट्रेनमध्ये 22 मार्चपासून पुढील नोटीसपर्यंत खाण्या-पिण्याच्या सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेची सहाय्यक कंपनी आयआरसीटीसीने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, त्यांनी सुद्धा सर्व फूड प्लाजा, जन आहार आणि स्वयंपाक पुढील नोटीसपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आदेशानुसार, प्रीपेड ट्रेनमध्ये जेवणाची व्यवस्था करणार्‍या संस्था आपली सेवा सुरू ठेवू शकतात. मेल एक्सप्रेस ट्रेन आणि ट्रेन साईड वेंडिंग (टीएसव्ही) ट्रेनमधील खाण्या-पिण्याची सेवा बंद ठेवली पाहिजे. यामध्ये म्हटले आहे की, जर ट्रेनमध्ये देण्यात येणार्‍या सेवांची मागणी झाली तर केवळ प्रोप्रायटी आर्टिकल डेपो (पीएडी) वस्तू, चहा आणि कॉफी ट्रेनमध्ये विकण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आदेशानुसार हे निर्देश 22 मार्चपासून लागू होतील.

* दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबादमध्ये लोकल ट्रेन केवळ खुपच आवश्यक मार्गावर चालतील.

* दिल्ली मेट्रोने रविवारी मेट्रो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

* राजस्थानच्या जयपुरमध्ये 22 मार्चपर्यंत मेट्रो बंद करण्यात आली आहे.

* नोएडा मेट्रो आणि नोएडा सिटी बस सेवा सुद्धा जनता कर्फ्यूदरम्यान पूर्णपणे बंद राहणार आहे.

* दिल्लीहून सर्व अंतरराष्ट्रीय उड्डाणांवर तात्पूरता प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व उड्डाणे 22 मार्च 29 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

* गो एयरने रविवारी आपली सर्व स्थानिक उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे इडिगोची केवळ 40% विमाने उड्डाण घेतील.

  • पीएम मोदी यांचे आवाहन

गुरुवारी सोशल डिस्टन्सींगबाबत पंतप्रधान मोदी यांनी 22 मार्चला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचे आवाहन केले आहे. पीएम मोदी यांनी म्हटले की, जरूरी सेवांशिवाय सर्व लोकांनी घरात राहण्याचा प्रयत्न करावा. कोरोना व्हायरससारख्या आव्हानाला तोंड देण्यासाठी ही आपल्यासाठी एक लिटमस टेस्ट असेल. हे काम राष्ट्रहितासाठी करायचे आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, या दरम्यान विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. केवळ इमर्जन्सी आणि जरूरी सेवा देणार्‍या व्यक्तीसोडून अन्य कुणीही आपल्या घरातून 22 मार्चला ठरलेल्या वेळी बाहेर पडू नये.