Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे ‘इथं’ अचानक कमी झाला ‘कंडोम’चा स्टॉक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस जगभरातील लोकांचे जीव घेत आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 6 हजारपेक्षा लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसने लोक इतके घाबरले आहेत की, ते घरातसुद्धा मास्क आणि सॅनिटायझरचा स्टॉक करत आहेत. ज्यामुळे मार्केटमध्ये सध्या या वस्तूंचा तुटवडा भासत आहे. आता या स्टॉकमध्ये आणखी एका वस्तूचा समावेश झाला आहे, ती आहे कंडोम.

विविध अंतरराष्ट्रीया मीडिया रिपोर्टमधून हे समोर आले आहे की, मास्क आणि सॅनिटायजरशिवाय आता जगातील अनेक देशात कंडोमचा तुटवडा जाणवत आहे. ब्रिटनमधील डेली वायरनुसार, ब्रिटनमध्ये औषधांच्या दुकानात मास्क आणि सॅनिटायजरनंतर कंडोमची मागणीही वाढली आहे.

जाणकारांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसमुळे लोक घरांमध्ये राहात आहेत. ते मास्क आणि सॅनिटायजरशिवाय कंडोमसुद्धा खरेदी करत आहेत. ज्यामुळे मार्केटमध्ये कंडोमचा सुद्धा तुटवडा निर्माण झाला आहे. अशीच स्थिती चीनमध्ये सुद्धा आहे. येथेही लोक मास्क आणि सॅनिटायजर सोबतच कंडोम खरेदी करून घरात ठेवत आहेत. येथे तर अनेक मेडिकल स्टोर्सचे शेल्फ रिकामे झाले आहेत.

याचे कारण असेही असू शकते की, लॉकडाउन सारखी स्थिती आहे. इटली आणि चीनमध्ये लोक घरातून बाहेर पडत नाहीत. इराणची परिस्थिती सुद्धा साधारण अशीच आहे. यामुळे लोक घरात अशा वस्तूंचा स्टॉक वाढवत आहेत. कोरोना व्हायरसचा सुरूवातीचा केंद्रबिंदू असलेला चीन पूर्णपणे हवालदिल दिसून आला. परंतु आता स्थिती सुधारत आहे. आता पुढील केंद्र बिंदू युरोप झाला आहे. यूरोपच्या अनेक देशात कोरोनाचा प्रकोप सुरू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीननंतर सर्वात जास्त प्रभावित इटली आहे. येथे 31 हजारपेक्षा जास्ते लोकांन संसर्ग झाला आहे.

युकेमध्ये 2600पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. तसेच 100 पेक्षा जास्त लोकांचा येथे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचे रूग्ण सतत वाढत आहेत. देशातील संक्रमित रूग्णांची संख्या 180 झाली आहे. ज्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 लोक बरे झाले आहेत. व्हायरसमुळे संपूर्ण जग अलर्ट मोडवर आहे. चीनमधील प्रकोप कमी झाला असला तरी युरोप आता केंद्र बिंदू झाला आहे. तर अमेरिकेत आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे.