Coronavirus Impact : शेअर बाजारात मोठी घसरण, 45 मिनिटं ट्रेडिंग बंद

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असल्यामुळे शेअर बाजारावरही दररोज मोठा परिणाम होत आहे. आज सकाळी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. पहिल्या दहा मिनिटातच सेन्सेक्स जवळपास 2 हजार 600 अंकाची घसरून 270 हजार 368 अंकांवर उघडला. तर निफ्टीही 792 अंकांची घसरून 7953 अंकावर उघडली आहे.

कोरोनाच्या संकटाचा फटका शेअर बाजारालाही बसताना दिसत आहे. सेन्सेक्समध्ये जवळपास 10 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. बाजार सुरु झाल्यानंतर काही वेळातच शेअर बाजारात लोअर सर्किट लावण्यात आले होते. त्यानंतर 45 मिनीटांसाठी ट्रेडिंग थांबवण्यात आले आहे. सकाळी 10.57 वाजेपर्यंतपर्यंत ट्रेडिंग थांबवण्यात आले होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करून पैसे काढून घेत आहेत, त्याचा परिणाम बाजारावर होत आहे. आठवडाभरात दुसर्‍यांदा शेअर बाजाराला लोअर सर्किट लावून ट्रेडिंग थांबवण्याची वेळ आली आहे.