COVID-19 : AC मुळं पसरू शकतो ‘कोरोना’, एक्सपर्ट म्हणाले – ‘बंद करा अन्यथा ही युक्ती वापरा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काही दिवसांपूर्वी जगभरातील एक्सपर्टच्या सल्ल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने स्वीकारले होते की, कोरोना व्हायरस हवेत सुद्धा असू शकतो. आता काही एक्सपर्टने म्हटले आहे की, लोकांनी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आपला एसी बंद करावा. जर त्याच ठिकाणी संक्रमित व्यक्ती असण्याची शंका असेल तर असे न केल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनही संसर्ग पसरू शकतो.

ब्रिटिश टेलिग्राफमध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार, एयर कंडिशनर्स दोन प्रकारचे असतात. एक जे बाहेरची हवा खेचतात आणि दुसरे जे खोलीतील हवाच रिसर्क्युलेट करतात. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, संसर्गाचा धोका असल्यास लोकांनी दुसर्‍या प्रकारचा एसी बंद करावा किंवा खिडक्या उघडाव्यात.

लंडनच्या चार्टर्ड इन्स्टिट्यूशन ऑफ बिल्डिंग सर्व्हिस इंजिनियर्सचे म्हणणे आहे की, ज्या एसीमध्ये बाहेरच्या हवेचा वापर होत नाही त्या रूममध्ये ते व्हायरस पसरवण्याचे काम करतात. यामुळे रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी संसर्ग पसरण्याचा धोका असू शकतो.

ब्रिटेनच्या रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंगचे डॉ. शॉन फिट्जगेराल्ड यांनी म्हटले की, धोका कमी करण्यासाठी एसी ऑन असताना खिडकी उघडी ठेवणे चांगला पर्याय आहे. किंवा थंड हवेची इच्छा सोडून एसी बंद करावी.

एप्रिलमध्ये संशोधकांनी म्हटले की, चीनच्या गुआनझोऊच्या एका रेस्टॉरन्टमध्ये जानेवारीमध्ये जेवण जेवण्यासाठी गेलेले किमान 9 लोक संक्रमित झाले होते. यासाठी रेस्टॉरंटचे एसी जबाबदार ठरवले गेले होते.

इमर्जींग इन्फेक्शन डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, वुहानचे एक कुटुंब गुआनझोऊच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आले होते. कुटुंबाचा एक सदस्य लक्षणे नसलेला संक्रमित होता. नंतर समजले की, रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या बाजूच्या टेबलवर बसलेले लोक सुद्धा संक्रमित झाले आहेत. टेबलमधील अंतर 3 फुटापेक्षा जास्त असूनही असे झाले आहे.

मात्र, संशोधकांचे हेदखील म्हणणे आहे की, हवेत कोरोना व्हायरस काही वेळासाठी जीवंत राहू शकतो आणि थोड्या अंतरापर्यंतच प्रवास करू शकतो. यापूर्वी 200 पेक्षा जास्त संशोधकांनी डब्ल्यूएचओला पत्र लिहून मागणी केली होती की, संघटनेने हवेतील कोरोनाची उपस्थिती पाहून आपली गाईडलाइन बदलावी.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like