जगात ‘कोरोना’ व्हायरसमुळं भीतीचं ‘सावट’ तर भारताला स्वाईन फ्लूचा ‘धोका’, 437 रूग्ण आढळले अन् 10 जणांचा मृत्यू

मेरठ : वृत्त संस्था – एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसने थरकाप उडवलेला आहे. तर भारतात स्वाइन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत तमिळनाडुत सर्वात जास्त 132 केस समोर आल्या आहेत, तर चौथ्या क्रमांकावर राजधानी दिल्ली आहे, येथे 43 रूग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात देण्यात आली आहे.

या अहवालानुसार, जानेवारीमध्ये सर्वात जास्त दिल्लीत 40 रूग्ण स्वाइन फ्लू ग्रस्त आढळले आहेत. यापैकी पाच रूग्ण असे आहेत जे चीनहून नुकतेच भारतात आले आहेत. त्यांना कोरोना व्हायरसच्या शक्यतेने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुण्यांपैकी एक नमुना पॉझिटीव्ह आढळला आहे.

नवी दिल्ली येथील डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलच्या एका विरष्ठ श्वासरोग तज्ज्ञाने सांगितले की, आतापर्यंत आरएमएलमध्ये चीनमधून परत आलेल्या 40 लोकांना भरती करण्यात आले आहे. कोणालाही कारोना व्हायरसची लागण झालेली नाही, परंतु तीन रूग्ण स्वाइन फ्लू ग्रस्त सापडले आहेत. वरिष्ठ हृदययरोग तज्ज्ञ डॉ. आरएन कालरा यांनी सांगितले की, वातावरणात झालेल्या बदलामुळे स्वाइन फ्लू सुद्धा अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. अशावेळी लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. स्वाइन फ्लूचे रूग्ण सापडत असून त्यांचा आजार नियंत्रणात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात 437 स्वाइन फ्लूग्रस्त रूग्ण आढळले आहेत. यापैकी 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त रूग्ण तमिळनाडु, तेलंगाना, कर्नाटक आणि दिल्लीत सापडले आहेत. पश्चिम बंगालकडून स्वाइन फ्लूबाबतची माहिती केंद्राला पाठवलेली नाही. उत्तर प्रदेश, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशात रूग्णांचा मृत्यूही झाला आहे.