काय सांगता ! होय, ‘इथं’ कोरोनाच्या धसक्यानं लोक घाबरून झोपताहेत शवपेटीतच

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे प्रत्येकाच्या मनात भीतीने घर केले आहे. भीती दूर करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. जपानमध्ये तर लोक आता घाबरून शवपेटीतच झोपू लागले आहे. कोरोनाची भीती दूर करण्यासाठी जपानमध्ये एका कंपनीने हा मार्ग शोधला आहे

लोकांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी जपानच्या एका कंपनीने एक आगळावेगळा शो आयोजित केला आहे. स्केअर स्क्वाड असे या शोचे नाव असून हा 15 मिनिटांचा शो आहे. यामध्ये दोन मीटर लांबीच्या एका बॉक्समध्ये जिवंत माणसांना एखाद्या मृतदेहाप्रमाणे शवपेटीत झोपवले जाते. त्यांना भीतीदायक अशा गोष्टी ऐकवल्या जातात. शवपेटीत झोपून तुम्हाला अभिनेत्यांना अभिनय करताना पाहू शकता.

काही नकली हातांचा तुम्हाला स्पर्श होऊ शकतो किंवा तुमच्यावर पाण्याचा फवाराही येऊ शकतो. स्केअर स्क्वाड या 15 मिनिटांच्या शोमुळे कोरोनाव्हायरच्या महासाथीत तणावपूर्ण अशी परिस्थिती आहे. लोकांना मोठ्याने ओरडण्याची संधी मिळते ज्यामुळे त्यांना थोडे बरे वाटेल. असे आयोजकांनी सांगितले. या शोमध्ये जाणारे कजुशिरो हाशिगुची यांनी अनुभव शेअर करताना कोरोनाव्हायरसमुळे अनेक गोष्टी रद्द झाल्या आहेत. मी तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक मार्ग शोधत होतो. हा शो पाहिल्यानंतर मला खूप बरे वाटत असल्याचे म्हटले आहे