‘या’ भीतीपोटी देशात 70 % स्वस्त झालं चिकन, विक्री झाली आर्धी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे भारतात चिकनची विक्रीमध्ये 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. ज्या कारणाने हे दर मागील महिन्यापासून 70 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. गोदरेज अ‍ॅग्रोवेटचे अधिकारी म्हणाले की सोशल मीडियावर अफवा पसरत आहे की चिकनमुळे व्हायरस पसरतो. यामुळे बाजारात चिकनच्या किंमतीत घट झाली आहे. गोदरेज अ‍ॅग्रोवेटचे प्रबंध निदेशक बीएस यादव म्हणाले की त्यांची पोल्ट्री शाखा गोदरेज टायसन फूड्स देखील या समस्येचा सामना करत आहे कारण मागील महिन्यापासून त्यांच्या विक्रीत 40 टक्कांची कपात झाली आहे. यापूर्वी आठवड्यात 6 लाख कोंबड्यांची विक्री होत होती, ज्यात आता बरीच कमी आली आहे.

ते म्हणाले की, जर 2-3 महिन्यात अफवा शांत झाल्या तर चिकनचा खप पुन्हा वाढेल आणि त्यानंतर देशभरात चिकन कमी असल्याची परिस्थिती निर्माण होईल,

अफवा पसरवणाऱ्याविरोधात कारवाईची मागणी
यादव म्हणाले की सरकारने सूचना जारी केली आहे की चिकनने कोरोना पसरत नाही. राज्य सरकारला देखील अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. यादव म्हणाले, भारतात चिकन खाणे सुरक्षित आहे, परंतु चिकनमुळे कोरोना व्हायरस पसरत असल्याच्या अफवांमुळे देशात फक्त 1 महिन्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री घटली आणि बाजारात किंमती 70 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

पहिल्या आठवड्यात होत होती 7.5 कोटी चिकनची विक्री
ते म्हणाले की, देशात एका आठवड्यात चिकनची विक्री 7.5 कोटीच्या तुलनेत कमी होऊन 3.5 कोटी झाली. तर मागील महिन्यात जी किंमत 100 रुपये किलोग्रॅम होती, ती आता बाजारात कमी होऊन 35 रुपये प्रति किलोग्रॅम झाली, परंतु त्याचा उत्पादन खर्च 75 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. यादव म्हणाले, कोंबड्यांमुळे कोरोना व्हायरस होतो अशा पसरणाऱ्या अफवांमुळे पोल्ट्री उद्योगावर परिणाम होत आहे. चिकनचे उत्पादन वाढले आहे, परंतु कमी किंमतीत बाजारात विक्री होत आहे.