coronavirus : ‘कोरोना’वर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरांकडे ‘सेक्स’ची मागणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे सर्व जगातील लोक संकटात सापडले आहेत. अशा संकटकाळात रुग्णांच्या सेवेत व्यस्त राहण्यासाठी जगभरातील डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात टाकला आहे. म्हणून त्यांच्याकडे देवदूत म्हणून पाहिले जात आहे. परंतु समाजातील काही विकृत माणसांनी डॉक्टरांना त्रास देण्याचे उद्योग चालूच ठेवले आहेत. काही ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत आहेत तर काही ठिकाणी महिला डॉक्टर आणि परिचारिकांविरूद्ध अश्लील इशारे करण्याचे प्रकारही घडले आहेत. तसेच काही ठिकाणी तर या विकृतांनी कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या महिला डॉक्टरांकडे लैंगिक संबंधाची मागणी केल्याचा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समोर आल्या आहेत.

हा लाजिरवाणा प्रकार पाकिस्तानमध्ये घडला आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या मदतीसाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांसाठी पाकिस्तानात एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. परंतु या अ‍ॅपचा लोक फायदा कमी आणि गैरफायदाच जास्त घेत आहेत. या अ‍ॅपद्वारे लोक महिला डॉक्टरांवर अश्लील शेरेबाजी, ऑनलाइन ट्रोलिंग आणि मानसिक छळ करत आहेत. या लाजिरवाण्या कृत्याबाबत महिला डॉक्टरांनी आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे.

महिला डॉक्टरांनी आपली व्यथा मांडताना म्हटले की, रुग्ण म्हणून येणाऱ्या काही लोकांकडून आमचे वय आणि इतर खासगी माहितीबाबत विचारणा होते तर काहींकडून पॉर्न साईटच्या लिंक पाठवल्या जातात आणि अश्लील छयाचित्रे देखील पाठवली जातात. या सर्व प्रकारांमुळे महिला डॉक्टरांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे अनेक महिला डॉक्टरांनी या क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असून आपली सेवा देणे इच्छा नसतानाही बंद केले आहे, या कारणामुळे कोरोना आपले पाय अधिक पसरवणार हे निश्चित आहे.

You might also like