Coronavirus : ‘कोरोना’मुळे बँक बंद तर होणार नाही ना ? निर्मला सीतारामण यांनी दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. याच दरम्यान बँकिंग सेवा सुरु राहणार का असा प्रश्न पडला आहे. कोरोना विषाणूमुळे अनेक सेक्टर बंद आहेत. कोरोनाचा धोक्याचा सामना करण्यासाठी बँकिंग क्षेत्रात अनेक बदल करण्यात आले आहेत. तरी देखील बँका सुरु राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी उत्तर दिले आहे.
निर्मला सीतारामण यांनी बँकांच्या बाबतीत सोमवारी सांगितले की, सर्व बँकांच्या शाखा सुरु आहेत.

एटीएमध्ये रक्कम उपलब्ध आहे, आणि सर्व बँकाचे एटीएम सुरु आहेत. बँकिंग सेवा सुरू आहेत. सोशल डिस्टेंसिंग ठेवण्यात येत आहे आणि सॅनटायझरचा वापर प्रत्येक बँकेत केला जाता आहे. जर कोणाला काही मदत किंवा काही माहिती पाहिजे असल्यास त्यांनी ट्विट करावे, असे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सांगितले.

दरम्यान, लॉकडाऊन नंतर देशामध्ये गरीब आणि कामगार लोकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गरीब आणि कामगारांसाठी 1.70 लाख कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच अनेक मोठ्या घोषणा केल्या असून याचा फायदा गरीब आणि हातावर पोट असलेल्यांना होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like