अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा इशारा, म्हणाले – ‘कोरोनाचा उगम शोधा, नाहीतर कोविड-26, कोविड-32 साठी तयार रहा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात थैमान घातलेला कोरोना Corona व्हायरस कुठून आला ? यावर साऱ्या जगाचे बोट चीनच्या वुहान लॅबकडे आहे. दरम्यान अमेरिकेची मीडिया कंपनी ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार कोरोनाच्या उत्पत्तीवरून अमेरिकेच्या 2 वैज्ञानिकांनी मोठा इशारा दिला आहे. कोविड-19 Covid-19 च्या उगमाचा शोध घ्या नाहीतर कोविड-26 अन् कोविड-32 साठी तयार रहा, असे म्हटले आहे. अमेरिकेच्या तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त असलेले स्कॉट गॉटलीब आणि टेक्सासच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटल सेंटर फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहाय्यक संचालक पीटर होट्स यांनी हा इशारा दिला आहे.

कामाची गोष्टी ! कर्ज घेतले असेल तर ‘या’ 3 छोट्या चुका कधीही करू नका, होऊ शकते मोठे नुकसान;जाणून घ्या

गॉटलीब हे सध्या कोरोना लस आणलेल्या फायझरच्या संचालक मंडळावर आहेत. कोविड- 19 Covid-19 च्या उगमाचा शोध घेण्यासाठी अन् भविष्य़ातील महामारीचा धोका टाळण्यासाठी चीनच्या सरकारने जगाची मदत करायला हवी. गॉटलीबच्या मतानुसार, चीनच्या लॅबमधूनच कोरोनाचा Corona जन्म आणि प्रसार झाल्याचा जगाच्या दाव्यांना आणखी काही ठोस पुरावे सापडले आहेत. मात्र चीनने हे पुरावे खोटे ठरविण्यासाठी काहीच माहिती दिली नाही. तर होट्सनी म्हटले की, ज्या पद्धतीने कोरोना पसरला आहे, त्यानुसार भविष्यात देखील महामाऱ्या पसरण्याचा धोका वाढला आहे. चीन भलेही वुहानमधून कोरोना पसरल्याचे नाकारत असला तरी त्याचे पुरावे आणखी प्रबळ होत आहेत. अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओनी चीनचे लष्कर वुहान लॅबच्या या कामांत सहभागी असल्याचा आरोप केला आहे. चीनच्या या लॅबमध्ये लष्कराशी संबंधीत हालचाली होत आहेत. त्याला सिव्हिलियन रिसर्च म्हटले गेले आहे. चीनने याबाबत WHO ला देखील माहिती देण्यास नकार दिला आहे.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी